Israel Iran Ceasefire : ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा, इराणची पहिली प्रतिक्रिया, 'इस्रायलला धडा शिकवण्यासाठी...'

Last Updated:

Israel Iran Ceasefire : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन्ही देशांमधील युद्ध थांबल्याची घोषणा केल्यानंतर इराणने ट्रम्प यांच्या घोषणेवर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा, इराणची पहिली प्रतिक्रिया, 'इस्रायलला धडा शिकवण्यासाठी...'
ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा, इराणची पहिली प्रतिक्रिया, 'इस्रायलला धडा शिकवण्यासाठी...'
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये शस्त्रसंधी लागू झाल्याचे जाहीर केले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन्ही देशांमधील युद्ध थांबल्याची घोषणा केल्यानंतर इराणने ट्रम्प यांच्या घोषणेवर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
इस्रायल आणि इराण या देशांमध्ये मागील 12 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. इस्रायलने इराण अणुसंशोधन केंद्रावर हल्ला करून या युद्धाची सुरुवात केली होती. त्यानंतर इराणने इस्रायलला प्रत्युत्तर दिले. तर, अमेरिकेनेदेखील यात एन्ट्री घेत इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केले. मागील 12 दिवसांपासून मध्यपूर्व आशियाला युद्धाची झळ लागत आहे. अमेरिकेने शस्त्रसंधीची घोषणा केली असली तरी यावरून गोंधळाची स्थिती आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना इस्रायलला इशारा दिला आहे.
advertisement

इराणने काय म्हटले?

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटले की, इराणने इस्रायलवर हल्ला केला नव्हता. याउलट इस्रायलने आमच्यावर हल्ला केला असल्याचे त्यांनी म्हटले. शस्त्रसंधी बाबत कोणताही करार झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर इस्रायली राजवटीने इराणी लोकांविरुद्ध बेकायदेशीर आक्रमण थांबवले तर, त्यानंतर आम्हाला त्याचे प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता भासणार नाही.
advertisement
advertisement
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी करार झाला आहे आणि तो "सहा तासांत" लागू होण्याची अपेक्षा असे आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते.
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुढे म्हटले की, इस्रायली राजवटीने तेहरान वेळेनुसार पहाटे 4 वाजेपर्यंत इराणी लोकांविरुद्ध बेकायदेशीर आक्रमण थांबवले तर, त्यानंतरही आमचा प्रतिसाद सुरू ठेवण्याचा कोणताही हेतू नाही. "आमच्या लष्करी कारवाया थांबवण्याबाबत अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल, असेही अराघची यांनी म्हटले.
advertisement
इस्रायलला त्याच्या आक्रमकतेची शिक्षा देण्यासाठी आमच्या शक्तिशाली सशस्त्र दलांच्या लष्करी कारवाया अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील असल्यचे त्यांनी म्हटले. सर्व इराणी लोकांसह, मी आमच्या शूर सशस्त्र दलांचे आभार मानतो जे त्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्या प्रिय देशाचे संरक्षण करण्यास तयार आहेत, असेही त्यांनी म्हटले.
advertisement

अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले...

दरम्यान, इराणने सोमवारी रात्री कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले केले. अमेरिकेने इराणच्या आण्विक तळावर हल्ले केले होते. त्याच्या प्रत्युत्तरात इराणने ही कारवाई केली.
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran Ceasefire : ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा, इराणची पहिली प्रतिक्रिया, 'इस्रायलला धडा शिकवण्यासाठी...'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement