Donald Trump : अमेरिकेसाठी हे सुवर्णयुग, ट्रम्प यांची विजयीगर्जना, म्हणाले, याआधी असं कधी घडलं नाही आणि...
- Published by:Suraj
Last Updated:
Donald Trump Victory : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केला. विजयानंतर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांचे आभार मानले आणि अमेरिकेसाठी हे सुवर्णयुग असल्याचं म्हटलंय.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना हरवून विजय मिळवलाय. या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडातील पाम बीच इथं समर्थकांशी संवाद साधला. यावेळी अमेरिकेसाठी हे सुवर्णयुग असल्याचं ते म्हणाले. ट्रम्प म्हणाले की, आतापर्यंतचं हे सर्वात मोठं राजकीय आंदोलन आहे. आम्ही आपल्या देशाला पुन्हा एकदा व्यवस्थित करण्यासाठी मदत करू. देशाला मदतीची गरज आहे. सीमा नीट करू. आज आपण इतिहास घडवला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुवर्णयुग सुरू कऱण्याची शपथ घेताना म्हटलं की, हे एक असं आंदोलन होतं जे याआधी कधीच कुणी पाहिलं नाही. खरं सांगायचं तर मला वाटतं की आतापर्यंतचं हे सर्वात मोठं राजकीय आंदोलन होतं. या देशात यापेक्षा मोठं कधी काही झालं नसावं.
#WATCH | West Palm Beach, Florida | Republican presidential candidate #DonaldTrump says, "...This is a movement that nobody has ever seen before. Frankly, this was, I believe, the greatest political movement of all time. There has never been anything like this in this country and… pic.twitter.com/MEcRDSAI72
— ANI (@ANI) November 6, 2024
advertisement
आम्ही आपल्या देशाची मदत करणार आहे. आपल्याकडे एक असा देश आहे ज्याला खूप मदतीची गरज आहे. आपण असे अडथळे पार केले ज्याचा कुणीही विचार केला नव्हता. आता हे स्पष्ट आहे की आपण विजय मिळवला आहे असंही ट्रम्प म्हणाले्.
हा एक असा राजकीय विजय आहे जो आपल्या देशाने याआधी कधी पाहिला नाही, असा कोणताच विजय नाही. मी अमेरिकेच्या लोकांचा निवडून आलेला ४७ वा राष्ट्राध्यक्ष आणि ४५ वा राष्ट्राध्यक्ष बनवल्याबद्दल तुमचे आभार मानतो. मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी लढेन. प्रत्येक दिवशी मी तुमच्या प्रत्येक श्वासासाठी लढेन. जोपर्यंत भक्कम, सुरक्षित आणि समृद्ध अमेरिका होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसू शकणार नाही असंही ट्रम्प म्हणाले.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. याआधी २०१६ च्या निवडणुकीत त्यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. मात्र २०२० च्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2024 1:52 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump : अमेरिकेसाठी हे सुवर्णयुग, ट्रम्प यांची विजयीगर्जना, म्हणाले, याआधी असं कधी घडलं नाही आणि...


