बाबो! 8 कोटी रुपयांचं एक केळं; इतकं काय आहे यात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
8 Crore Banana : एका केळ्याची किंमत पाच रुपये, सहा रुपये फार तर फार 10 रुपये असू शकते. पण न्यूयॉर्कमध्ये एका भिंतीवर टेपने चिकटवलेल्या केळाची किंमत तब्बल आठ करोड रुपये ठेवण्यात आलीय.
नवी दिल्ली : बाजारामध्ये केळी खरेदी करण्यासाठी गेल्यावर तुम्हाला ती 50 ते 60 रुपये डझन सहज मिळतील. वर्षातील 12 महिने केळी बाजारात विक्रीसाठी येतात. त्यामुळे केळांच्या किमती सहसा फार वाढत नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातच या किमती असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, न्यूयॉर्कमध्ये एका केळाची किंमत तब्बल 8 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
एका केळाची किंमत पाच रुपये, सहा रुपये फार तर फार 10 रुपये असू शकते. पण न्यूयॉर्कमध्ये एका भिंतीवर टेपने चिकटवलेल्या केळाची किंमत तब्बल आठ करोड रुपये ठेवण्यात आलीय. या केळाचा लवकरच लिलाव होणार आहे. चला तर, या केळाचं असं काय वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे त्याची किंमत करोडोंमध्ये आहे, ते जाणून घेऊ.
advertisement
भिंतीवर चिटकवण्यात आलेली केळं इटालियन कलाकार मॉरिझिओ कॅटेलनची कलाकृती असून ज्याला त्याने 'कॉमेडियन' असं नाव दिलंय. हे केळं त्याने व्यंगात्मक शैलीत काढल्यानं त्याची जगभरात चर्चा सुरू झालीय. सोथबी ऑक्शन हाउसद्वारे आता या केळाच्या पेंटिंगचा ऑनलाईन लिलाव ठेवण्यात आला होता.
मीडिया वृत्तानुसार, मॉरिझिओ यांनी केळाच्या अशा तीन कलाकृती बनवल्या होत्या. त्यापैकी दोन विकल्या गेल्या आहेत. ही कलाकृती जागतिक व्यापार आणि उपभोगवादाचे प्रतीक आहे, असं म्हटलं जातं.
advertisement
या बाबत ऑक्शन हाउसचे डेव्हिड गॅल्परिन म्हणाले की, 'कॉमेडियन' ही मॉरिझिओच्या सर्वांत उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे. यामुळेच त्याची सुरुवातीची बोली एक मिलियन डॉलर्स ठेवण्यात आलीय. या पूर्वी मॉरिझिओच्या काही कलाकृतींची 142 कोटींहून अधिक किंमतीला विक्री झालीय.
दरम्यान, ह्युमनॉइड रोबो ए-दाने बनवलेलं एक पेंटिंग देखील सध्या चर्चेत आहे. हे पेंटिंग कॉम्प्युटर सायन्सचे जनक एलेन मॅथिसन ट्युरिंग यांना समर्पित करण्यात आलंय. या पेटिंगच्या लिलाव म्हणजे टेक्नॉलॉजी आणि कला असा अनोखा संगम आहे. ‘बनाना आर्ट’ आणि रोबोद्वारे बनवलेलं पेटिंग यावरून कला आता केवळ पारंपरिक चित्रे किंवा शिल्पांपुरती मर्यादित राहिलेली नसल्याचं स्पष्ट होतंय.
advertisement
एखाद्या कलाकाराच्या पेटिंगला कोट्यावधी रुपये देऊन त्याच्या कलेचा एकप्रकारे सन्मान यानिमित्तानं केला जात असल्याची चर्चाही सुरू आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
April 07, 2025 10:05 AM IST


