ब्रिटनच्या राणीच्या राजवाड्यापेक्षा 4 पट मोठा, भारतातील अद्भुत असा राजवाडा, जबरदस्त सुविधा, किंमत किती?

Last Updated:

Wonderful Palace in India - या राजवाड्याला जगातील सर्वात मोठ्या राजवाड्यांमध्ये स्थान मिळाले आहे. ब्रिटनच्या राणीचा राजवाडा असलेला 4 बकिंगहॅम पॅलेस यामध्ये सामावू शकतात, इतका हा राजवाडा मोठा आहे. या राजवाड्यात 170 खोल्या आणि अनेक बागाही आहेत. हा राजवाडा 700 एकरमध्ये पसरलेला जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान आहे.

भारतातील सर्वात मोठा राजवाडा
भारतातील सर्वात मोठा राजवाडा
वडोदरा : स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज हे त्यांची पत्नी बेगोना गोमेज यांच्यासह आज 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान, भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांचेज यांच्या दरम्यान, गुजरातच्या बडोदामध्ये लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये बैठक होणार आहे. बडोदाचे महाराजा सयाजीराव गायकवाड (तृतीय) यांनी 1880 मध्ये लक्ष्मी विलास पॅलेसचे निर्माण केले होते. या राजवाड्याला जगातील सर्वात मोठ्या राजवाड्यांमध्ये स्थान मिळाले आहे. ब्रिटनच्या राणीचा राजवाडा असलेला 4 बकिंगहॅम पॅलेस यामध्ये सामावू शकतात, इतका हा राजवाडा मोठा आहे. या राजवाड्यात 170 खोल्या आणि अनेक बागाही आहेत. हा राजवाडा 700 एकरमध्ये पसरलेला जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान आहे.
लक्ष्मी विलास पॅलेस हा राजवाडा भारतातील सर्वात भव्य वास्तूंपैकी एक आहे. या राजवाड्याची रचना रॉबर्ट फेलो चिशोल्म यांनी केली होती. हा राजवाडा बांधण्यासाठी तब्बल 12 वर्षे लागली. आज जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान राजवाड्यांमध्ये त्याची गणना होते. हा राजवाडा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राजवाड्यांपैकी एक आहे. याच्या परिसरात मोती बाग पॅलेस, मकरपुरा पॅलेस, प्रताप विलास पॅलेस आणि महाराजा फतेह सिंह म्यूजिअम बिल्डिंग सारखी इतर इमारतींचाही समावेश आहे. तसेच एक सुंदर नवलखी पायविहीर आणि एक लहान प्राणी संग्रहालय देखील आहे.
advertisement
आतील सजावट आणि आकर्षण -
या राजवाड्याच्या आतील सजावट ही पाहण्यासारखी आहे. यामध्ये सुंदर दरबार हॉल, व्हेनिसमधून आयात केलेले मोझेक फ्लोर, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सुंदर ठिकाणे, काचेच्या खिडक्या यामुळे अधिक आकर्षक बनले आहे. विदेशी झुंबरही याची शान वाढवत आहेत.
आधुनिक सुविधा -
शहरातील क्रिकेटशी संबंधित उपक्रम मोतीबाग पॅलेसजवळील मैदानात होतात. येथे गोल्फ कोर्स, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि मोतीबाग क्रिकेट मैदान तसेच एक संग्रहालय आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय आहे. या राजवाड्यात लिफ्ट, टेलिफोन एक्स्चेंज आणि वीज व्यवस्था यासारख्या अनेक आधुनिक सुविधा आहेत. यासाठी परदेशी कारागिरांना बोलवण्यात आले होते. हा विशाल राजवाडा आजही एक राजेशाही निवासस्थान आहे आणि पर्यटकांसाठी खुला आहे.
advertisement
वर्तमान मालक आणि मालमत्तेचे मूल्य -
लक्ष्मी विलास पॅलेस या राजवाड्याचे सध्याचे मालक हे एच. आर. एच. समरजीतसिंह गायकवाड आहेत. त्यांनी 2012 मध्ये आपले वडील रंजीतसिंह प्रतापसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर हे पद सांभाळले. त्यांचा विवाह हा 2002 मध्ये वांकानेरच्या राजपरिवाराशी संबंधित राधिकराजे यांच्यासोबत झाला. त्या आधी पत्रकार होत्या. तसेच समरजीत यांना दोन मुली आहेत.
advertisement
या राजवाड्याची किंमत -
या राजवाड्याची सध्याची किंमत सुमारे 24 हजार कोटी रुपये आहे. ही किंमत भारतात बांधलेल्या कोणत्याही खाजगी निवासस्थानापैकी सर्वाधिक आहे. जेव्हा हा राजवाडा बांधला गेला तेव्हा त्याची किंमत फक्त 18 हजार ग्रेट ब्रिटन पौंड म्हणजे भारतीय चलनात अंदाजे 19,06,950 रुपये होती. पण आज ही देशातील सर्वात महागडी मालमत्ता बनली आहे.
advertisement
पर्यटकांसाठी आकर्षण -
लक्ष्मी विलास पॅलेस हे पर्यटकांसाठी सर्वात प्रभावी आकर्षणांपैकी एक आहे. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी 5 पर्यंत तो खुला असतो. तर दुपारी 1 ते दीड वाजेपदरम्यान, लंचब्रेकमध्ये बंद असते. तसेच सोमवारी हा राजवाडा बंद असतो.
मराठी बातम्या/Viral/
ब्रिटनच्या राणीच्या राजवाड्यापेक्षा 4 पट मोठा, भारतातील अद्भुत असा राजवाडा, जबरदस्त सुविधा, किंमत किती?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement