सहन झाला नाही दुरावा, घटस्फोटानंतर एक्स पतीसोबतच लिव्ह इन रिलेशन, दररोज शारीरिक संबंध, नंतर घडलं ते धक्कादायक

Last Updated:

Couple live in relationship news : महिला एक्स पतीसोबतच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. यादरम्यान त्यांच्यात अनेक वेळा शारीरिक संबंध झाले. लिव्ह इन रिलेशनशिपचा महिलेचा निर्णय सर्वात वाईट ठरला

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
अहमदाबाद : पती-पत्नीमध्ये भांडणं आणि त्यानंतर घटस्फोटाची प्रकरणं कमी नाहीत. सामान्यपणे घटस्फोटानंतर दोघांचेही मार्ग वेगवेगळे होतात. कुणी एकटं आयुष्य जगतं, तर कुणी दुसरा पार्टनर शोधून दुसरं लग्न करतं. पण एक असं कपल ज्यांनी घटस्फोट घेतला पण त्यांना दुरावा सहन झाला नाही म्हणून ते एकमेकांसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागले. त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे.
गुजरातच्या राजकोटमधील हे प्रकरण आहे. कपलचं लग्न 2019 साली झालं होतं. 2022 मध्ये त्यांना एक मुलगा झाला. तोपर्यंत सगळं काही ठिक होतं. पण मुलाच्या जन्मानंतर त्यानंतर मात्र त्यांच्यात बिनसलं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात भांडणं होऊ लागली. अखेर 12 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घटस्फोट घेतला. तेव्हा मुलगा तीन वर्षांचा होता. घटस्फोटानंतर मुलाचा ताबा वडिलांना मिळाला.
advertisement
घटस्फोटानंतर अवघ्या 5 दिवसांनी 17 डिसेंबर 2024 पासून महिला एक्स पतीसोबतच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. तिने तिच्या मुलासाठी हा निर्णय घेतला. यादरम्यान त्यांच्यात अनेक वेळा शारीरिक संबंध झाले. पण एके दिवशी महिलेने शारीरिक संबंधाला नकार दिला आणि लिव्ह इन रिलेशनशिपचा तिचा निर्णय सर्वात वाईट निर्णय ठरला.
advertisement
महिलेने आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिचं अनेक वेळा शारीरिक शोषण केलं. जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्याने तिला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. घटस्फोटानंतर ती त्याच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही, असं पतीने सांगितल्याचं ती म्हणाली.
महिलेने सांगितलं की, जानेवारी 2025 मध्ये तिच्या एक्स पतीने अहमदाबाद आणि नंतर राजकोटमध्ये तिचं शारीरिक शोषण केलं. त्याने तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, तिचा फोन नंबर बंद केला आणि तिला एक नवीन नंबर दिला. त्याने महिलेला तिच्या पालकांशी बोलण्यापासूनही रोखलं. त्याच महिन्यात, जेव्हा महिलेच्या वडिलांचा अपघात झाला, तेव्हा तिच्या एक्स पतीने तिला तिच्या मामाच्या घरी सोडलं जेणेकरून ती तिच्या वडिलांची काळजी घेऊ शकेल.
advertisement
शेवटी 23 जानेवारी 2025 रोजी हे लिव्ह-इन रिलेशनशिप देखील संपुष्टात आलं. पण मुलाचा ताबा अजूनही एक्स पतीकडेच होता. महिलेने आणि तिच्या कुटुंबाने मुलाला परत मिळवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्यांना महिन्यातून एकदाच मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली. अखेर 16 जून 2025 रोजी महिलेने तिच्या मुलाच्या ताब्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. तसंच तिने विद्यापीठ पोलीस ठाण्यात तिच्या एक्स पतीविरुद्ध तक्रार दाखल केली, ज्यामध्ये तिने शारीरिक शोषण आणि धमक्यांचा उल्लेख केला. पोलिसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला.
view comments
मराठी बातम्या/Viral/
सहन झाला नाही दुरावा, घटस्फोटानंतर एक्स पतीसोबतच लिव्ह इन रिलेशन, दररोज शारीरिक संबंध, नंतर घडलं ते धक्कादायक
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement