घरी कोणीच नव्हतं, सासूला घेऊन बाथरूममध्ये गेली सून, परत आलेला नवरा दृश्य पाहून गार पडला

Last Updated:

घरी कोणीही नसताना सूनेने तिच्या सासूला बाथरूममध्ये नेले आणि असं काही केलं की सर्वांनाच धक्का बसला. घटनेनंतर महिलेचा नवरा आला तेव्हा बाथरूममधील दृश्य पाहून तो ओरडला.

News18
News18
इंदूर :  सासू सुनेची कितीतरी प्रकरणं तुम्ही ऐकली असतील. प्रत्येक कुटुंबात सासू-सुनेची स्टोरी असते. मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एका घरातील अशीच एक सासूसूनेची कहाणी ज्यामुळे सगळे हादरले आहेत. सासू आणि सून दोघीच घरात होत्या. तेव्हा सुनबाई सासूबाईंना बाथरूममध्ये घेऊन गेली. त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे. नवरा घरी परत आल्यानंतर त्याने जे पाहिलं त्यामुळे तो पुरता हादरला.
मध्य प्रदेशातील इंदूरमधील विजय नगरमधील हे प्रकरण. शीतल नगर येथील रहिवासी संदीपचं लग्न एक वर्षापूर्वी नेहा नावाच्या महिलेशी झालं होतं. नेहाचं हे चौथं लग्न होतं आणि तिला आधीच्या लग्नांपासून दोन मुलंही आहेत. लग्नापासून नेहा आणि तिची सासू गोमतीबाई यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असत. या सगळ्यामध्ये संदीपला कामासाठी बाहेर जावे लागत असे.
advertisement
एकदा नेहाची तब्येत बिघडल्यामुळे तिने तिच्या सासूला जेवण बनवायला सांगितलं. पण तिने जेवण बनवण्यास नकार दिला. यानंतर सासू आणि सूनमध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी संदीप घरी नव्हता. हा वाद हळूहळू इतका वाढला की तो मारामारीपर्यंत पोहोचला. रागाच्या भरात नेहाने गोमतीला बाथरूममध्ये ओढलं आणि तिथं ढकलले. नेहाने जवळच पडलेला एक दगड उचलला आणि गोमतीच्या डोक्यात घातला. दगडाने तिने डोक्यावर वारंवार वार केले. या हल्ल्यांमुळे गोमती रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच पडली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच संदीप आणि त्याचे वडील कौशल घरी पोहोचले. तिथे त्यांना गोमती बाथरूममध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी गोमतीला मृत घोषित केलं.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत नेहाला ताब्यात घेतलं आणि तिच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नेहा आणि संदीपचं लग्न फक्त एक वर्ष झालं होतं. या घटनेमागील सर्व पैलू समजून घेण्यासाठी पोलीस या प्रकरणात नेहाच्या मागील वैवाहिक जीवनाबद्दल आणि तिच्या मुलांबद्दलही माहिती गोळा करत आहेत.
मराठी बातम्या/Viral/
घरी कोणीच नव्हतं, सासूला घेऊन बाथरूममध्ये गेली सून, परत आलेला नवरा दृश्य पाहून गार पडला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement