Airplane Fact : विमानातील AC बंद झाला तर काय होईल? खरंच लोक उंचावर तडफडू लागतील का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
विमान हे आकाशात खूप उंचावर उडतं आणि उंचावर उडत असताना त्यावर हवेचा दाब बनतो शिवाय ऑक्सिजन लेवल देखील खूप कमी होते. मग अशात एसी बंद झाला तर काय होऊ शकतो?
मुंबई : आजही असे अनेक लोक आहेत ज्यांसाठी विमानात बसणं हे स्वप्न आहे. तर बहुतांश लोकांनी विमानाने प्रवास केला असेलच. पण या सगळ्यात प्रत्येकालाच विमानाबद्दल बहुतांश गोष्टीचं कौतुक असतं. लोकांना विमानात प्रवास करताना वेगवेगळे प्रश्न पडतात. या सगळ्यातील कॉमन प्रश्न असा की विमानात एसी बंद झाला तर काय होईल?
विमान हे आकाशात खूप उंचावर उडतं आणि उंचावर उडत असताना त्यावर हवेचा दाब बनतो शिवाय ऑक्सिजन लेवल देखील खूप कमी होते. मग अशात एसी बंद झाला तर काय होऊ शकतो? हा प्रश्न लोकांना पडणं सहाजिकच आहे. खरंतर या संबंधीत एक खरी घटना घडली त्यामुळे एसी बंद झाला तर काय होईल हे उदाहरणा मार्फत समोर आलं आहे. चला आपण एसीचं महत्व समजून घेऊ.
advertisement
12 जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर सतत विमानातील तांत्रिक बिघाडांच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी आता हवाई प्रवास करण्यास घाबरू लागले आहेत. बुधवारी दिल्ली विमानतळावर असाच एक प्रकार घडला.
दिल्लीहून सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइटमध्ये एसी खराब झाल्याने प्रवाशांनी मोठा गोंधळ घातला. जवळपास दोनशेहून अधिक प्रवाशांना दोन तास विमानात बसवल्यानंतर अखेर त्यांना बाहेर उतरवावं लागलं. कारण त्यांना श्वास घेणं ही कठीण झालं. यानंतर आता प्रश्न असा निर्माण होतो की विमानात एसी बंद झाल्यावर इतका बवाल का होतो?
advertisement
STORY | Passengers deplaned from Air India's Singapore-bound plane at Delhi airport
More than 200 passengers on a Singapore-bound Air India plane faced a tough time at the Delhi airport on Wednesday evening as all of them were deplaned after being seated in the aircraft for… pic.twitter.com/pwXGekfYM6
— Press Trust of India (@PTI_News) September 10, 2025
advertisement
एसीचा खरा उपयोग काय?
साधारणपणे लोकांना वाटतं की विमानातील एसी फक्त थंडावा देण्यासाठी असतो. मात्र हे पूर्णपणे चुकीचं आहे.
विमानातील एअर कंडीशनिंग सिस्टम हे केवळ थंडावा पुरवण्यासाठी नसून, केबिनमधील हवेचा दाब (Cabin Pressure) आणि श्वसनासाठी योग्य हवा मिळावी यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो.
हा सिस्टम हवेची गुणवत्ता टिकवून ठेवतो आणि प्रवाशांसाठी सुरक्षित वातावरण तयार करतो. ज्यामुळे त्यांना श्वसनाशी संबंधीत प्रश्न उद्भवत नाहीत.
advertisement
विमानात किती टनचा असतो एसी?
एअर कंडीशनिंगची क्षमता विमानाच्या मॉडेल आणि साईजवर अवलंबून असते. म्हणजेच प्रत्येक विमानासाठी एसी सिस्टम वेगवेगळा असतो.
एसी "पॅक" म्हणजे काय?
एअर कंडीशनिंग सिस्टमचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एसी पॅक. तो साधारणपणे विमानाच्या पंखांच्या खाली, लँडिंग गिअर जवळ असतो. हा पॅक इंजिन किंवा APU (Auxiliary Power Unit) कडून येणारी गरम हवा थंड करून प्रवाशांना योग्य तापमानाची हवा पुरवतो.
advertisement
विमानातील एसी फक्त प्रवाशांना थंडावा देण्यासाठी नसून, प्रेशर कंट्रोल, ऑक्सिजनचा योग्य पुरवठा आणि सुरक्षित प्रवास यासाठी अत्यावश्यक असतो. त्यामुळे फ्लाइटमध्ये एसी खराब होणं हा छोटा बिघाड नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित गंभीर मुद्दा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 6:34 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Airplane Fact : विमानातील AC बंद झाला तर काय होईल? खरंच लोक उंचावर तडफडू लागतील का?