प्रेमासाठी सीमा ओलांडली, वाटेत तहान लागली, कुठेच मिळालं नाही पाणी; पाकिस्तानी जोडप्याचा दुर्दैवी अंत

Last Updated:

जैसलमेरमध्ये पाकिस्तानातून आलेलं एक प्रेमी जोडपं तहानेने मरण पावले. मृतदेह 4-5 दिवसांनी आढळले असून, मुलगी अल्पवयीन आणि दोघंही एका जिल्ह्यातील...

Pakistani couple
Pakistani couple
भारत-पाकिस्तान सीमेजवळील जैसलमेर जिल्ह्यात एका पाकिस्तानी जोडप्याचा तहान लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या जोडप्याने पाकिस्तानातून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, वाळवंटातील तळपत्या उन्हात तहान लागल्याने दोघांचाही तिथेच तडफडून मृत्यू झाला. मृत्यूनंतर सुमारे चार ते पाच दिवसांनी दोघांचे मृतदेह आढळून आले.
6 महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह
दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून, ते दोघेही पाकिस्तानचे रहिवासी होते. त्यांनी घरातून पळून जाऊन सुमारे सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. धक्कादायक म्हणजे, यातील मुलगी अल्पवयीन आहे. पोलिसांनी वैद्यकीय मंडळाकडून दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते स्थानिक रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत.
तहान लागली, पण मिळालं नाही पाणी...
स्थानिक पोलीस स्टेशननुसार, मृतदेहांजवळ एक मोबाईल फोन, पाकिस्तानी सिम आणि पाकिस्तानी भाषेतील मतदार ओळखपत्र सापडले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दोघांनी 6 महिन्यांपूर्वी लग्न केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दोघेही घरातून गायब झाले होते. नंतर त्यांनी सीमेवरील कुंपण ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. प्रथमदर्शनी, दोघांच्या मृत्यूचे मुख्य कारण तळपत्या उन्हात लागलेली तहान असल्याचे मानले जात आहे.
advertisement
कडक उन्हामुळे मृतदेह जळाले
पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, भारत-पाकिस्तान कुंपणाच्या आत सुमारे 10-12 किलोमीटरवर भारतीय सीमेवरील साधेवाला परिसरात शनिवारी दोघांचे मृतदेह सापडले. तानोट पोलिसांनी दोन्ही मृतदेह रामगढ येथील सीएचसीच्या शवागारात ठेवले आहेत. मृतदेहांजवळ सापडलेल्या ओळखपत्रावर तरुणाचे नाव रवी कुमार (18), वडील दीवान डाकघर गुलाम हुसैन लिगारी, घोटकी, सिंध, पाकिस्तान असे आहे. मुलगी अल्पवयीन असून, तिचे नाव शांती बाई, वडील गुलोजी, रा. पाकिस्तान असे आहे. दोघेही एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांचे रहिवासी होते. मृतदेह जुने झाल्याने ते उन्हाने जळालेल्या अवस्थेत होते.
advertisement
जवान करताहेत तपास
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सिम आणि ओळखपत्रांसह मृतदेह सापडल्याने सुरक्षा यंत्रणा, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि जैसलमेर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जवळच्या गावांमध्येही चौकशी केली जात आहे. दोघेही पाकिस्तानातून व्हिसावर जैसलमेरमध्ये राहत असावेत, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर, त्यांनी सीमेवरील तारेचे कुंपण ओलांडल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणा सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून, तानोट पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
प्रेमासाठी सीमा ओलांडली, वाटेत तहान लागली, कुठेच मिळालं नाही पाणी; पाकिस्तानी जोडप्याचा दुर्दैवी अंत
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement