अद्भुत! या बेंचवर बसताच दिसतं जगातील सगळ्यात सुंदर दृश्य, कोणतं? Watch Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
beautiful place video viral : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक बेंच दिसतो आहे. जो जमिनीपासून काही अंतरच उंच आहे. व्हिडीओला 10 पैकी 10 असं रेटिंग दिलं जात आहे. आता हा बेंच पाहिल्यावर त्याला असे रेटिंग का? या बेंचमध्ये असं काय खास आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडेल.
नवी दिल्ली : जगभरात बरीच पर्यटनस्थळं आहेत. शक्यतो लोक अशाच प्रसिद्ध ठिकाणी फिरायला जातात. पण काही ठिकाणं अशी आहेत ज्याबाबत सगळ्यांनाच माहिती नसते. ही ठिकाणं इतकी सुंदर असतात की तुम्ही विचारही केला नसेल. अशाच एका ठिकाणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक बेंच दिसतो आहे. जो जमिनीपासून काही अंतरच उंच आहे. व्हिडीओला 10 पैकी 10 असं रेटिंग दिलं जात आहे. आता हा बेंच पाहिल्यावर त्याला असे रेटिंग का? या बेंचमध्ये असं काय खास आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. सुरुवातीला तुम्ही गोंधळाल पण जसा कॅमेरा बेंचवरून दुसरीकडे फिरेल तेव्हा तुम्ही थक्क व्हाल.
advertisement
एका छोट्याशा बेंचनंतर तुमच्यासमोर निसर्गाचं सुंदर असं दृश्य आहे. निळंशार आकाश, उंच डोंगर आणि फेसाळलेला पांढराशुभ्र समुद्र. जणू काही स्वर्गच पृथ्वीवर अवतरला असं हे दृश्य. हे असं सुंदर दृश्य या बेंचवर बसल्यावर तुम्हाला दिसतं. इथं बसून हा नजारा तुम्हाला डोळ्यात भरून घेता येतो.
advertisement
advertisement
@sxtraveler या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये या ठिकाणाची माहितीही दिली आहे. 'हा कदाचित मदेइरामधील सर्वात नेत्रदीपक बेंच व्ह्यूपैकी एक असेल.', असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. एका युझरने ही जगातील सर्वोत्तम सीट असल्याचं म्हटलं आहे, एकाने 10 पैकी 1000 रेटिंग दिले आहेत. तर बहुतेकांनी याला स्वर्ग म्हटलं आहे. तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
advertisement
कुठे आहे मदेइरा?
मदेइरा हे भूमध्य समुद्राच्या पश्चिमेला अटलांटिकमधील एक पोर्तुगीज बेट आहे. इथं काही उत्तम लँडस्केप, गार्डन्स, फुलं आहेत. इथं अनेक समुद्रकिनारे आहेत. त्यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे कॅल्हेटा, जो मदेइरामधील सर्वोत्तम रिसॉर्ट्सपैकी एक आहे. या समुद्रकिनाऱ्यावर सोनेरी वाळू, स्फटिकासारखे स्वच्छ पाणी आणि एक मरीना आहे. हा समुद्रकिनारा कॅनोइंग आणि विंडसर्फिंगसारख्या विविध जलक्रीडा खेळांसाठी देखील चांगला आहे.
advertisement
लिडो इथं एक मोठा आणि लहान बाहेरील समुद्री पाण्याचा स्विमिंग पूल आहे, ज्याला थेट समुद्रात प्रवेश देखील आहे. पोंटा गोर्डामध्ये देखील असंच बाहेरील समुद्री पाण्याचे पूल आहेत. गोल्फ चाहत्यांसाठी मदेइरा बेटावर काही गोल्फ कोर्स देखील आहेत.
Location :
Delhi
First Published :
September 27, 2025 9:11 AM IST