स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा फसला प्लान, तोल गेला आणि भयानक घडलं, घटनेचा Video समोर

Last Updated:

या व्हिडीओत एक तरुण रस्त्यावर स्केटिंग करु पाहात आहे. ते ही एका कारच्या मदतीने. तेव्हाच या तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : रिल्सच्या या जमान्यात कोणाला ही मागे रहायचं नाही. जो तो प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवतो, खास करुन तरुण मंडळी तर आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. काही सेकंदाच्या रिल्ससाठी स्टंटबाजी करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून काही सेकंदासाठी तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.
या व्हिडीओत एक तरुण रस्त्यावर स्केटिंग करु पाहात आहे. ते ही एका कारच्या मदतीने. तेव्हाच या तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला. या व्हिडिओमधील मुलाला स्टंटबाजी केल्यामुळे अटक झाली.
हा तरुण एका कारच्यामागे स्केटिंगने जात होता. तेव्हाच त्याचा तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला. त्याची धडक इतकी जोरात होती की तो थेट उडाला, तो घाबरुन मागून येणाऱ्या गाडीला पाहू लागला. नशिबाने मागच्या बाईक चालकाने हुशारी दाखवत बाजूला गाडी नेली, ज्यामुळे या तरुणाचा जीव वाचला.
advertisement
या तरुणाला दुखापती झाली असावी, परंतू त्याचं नशीब चांगलं असल्यामुळे प्राण मात्र वाचले आहेत.
हा व्हिडीओ X वर Nikky Mathur नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.  व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'नक्कीच तुम्ही प्रत्येक गेम हराल... पण आयुष्याचा खेळ गमावू नका. शेवटाची वाट पहा.' ज्याला अगदी काही वेळात लाखो व्ह्यूज आले आहेत, लोक या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा फसला प्लान, तोल गेला आणि भयानक घडलं, घटनेचा Video समोर
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement