लव्ह मॅरेजनंतरचा पहिला दिवस! कपलने शेअर केला VIDEO, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं दाखवलं

Last Updated:

Couple Video Viral : लव्ह मॅरेज करणाऱ्या महिलेने लग्नाच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एक व्हिडिओ शेअर केला. जो तुफान व्हायरल होतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : सोशल मीडियावर असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या दैनंदिन दिनचर्येशी संबंधित गोष्टी शेअर करतात. त्यापैकी काही जण स्वतः स्वयंपाक करतानाचे व्हिडिओ अपलोड करतात, तर काही जण त्यांच्या पतींसोबत नाचताना दिसतात. काही महिला लग्नाला जातात आणि त्यांच्या नृत्याने खळबळ माजवतात, तर काही त्यांचे वैयक्तिक व्हिडिओ शेअर करतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये एक महिला जिने लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतरचा व्हिडीओ शेअर केला आहे.
'लव्ह मॅरेजनंतरचा पहिला दिवस', असं कॅप्शन या व्हिडीओला महिलेनं दिलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पती-पत्न दोघं झोपले आहेत. सकाळ होताच पत्नीला अचानक जाग येते ती तिच्या पतीला मोठ्याने आवाज देत उठवू लागते. ती म्हणते, 'कुशल, उठ, 8 वाजले आहेत.' जेव्हा नवरा तिला झोपायला सांगतो तेव्हा वधू म्हणते, 'बाहेरचे सगळे काय विचार करतील?' शेवटी ती कशाबद्दल बोलत आहे, हा प्रश्न तुमच्या मनातही निर्माण होईल. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल.
advertisement
यानंतर ती आंघोळ करायला जाते आणि बाहेर येते आणि साडी घालू लागते. मग नवरा बाथरूममधून बाहेर येतो आणि विचारतो की तू काय करतेस? बायको म्हणते, मी साडी नेसण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते होत नाहीये. नवरा तिला साडीऐवजी दुसरा ड्रेस घालायला सांगतो. पण वधू नकार देते. नंतर पती पत्नीला साडी नेसण्यास मदत करतो. मग स्वयंपाकघरात नवविवाहित वधू शीरा बनवते. ते कसं बनेल याबाबत तिला टेन्शन येतं. पण नवरा म्हणतो की काही फरक पडत नाही, जर ते नीट बनलं नाही तर आपण स्विगी करू.
advertisement
advertisement
नंतर घरी काही पाहुणेही आले आहेत. प्रेमविवाह करणारे जोडपे त्यांना भेटायला जातं. वधूची सासू त्यांच्याशी बोलत असते. वधूला साडीत पाहून पाहुणेही आनंदी दिसतात. पाहुणा म्हणतो, "तुमच्या सुनेनं साडी नेसली आहे, ती खूप सुंदर दिसते." मग सासू स्पष्टपणे म्हणते, ती माझी सून नाही, ती माझी मुलगी आहे.
advertisement
कुशल आणि खुशी या कपलने @kushalkikhushi या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना अनेक महिला युझर्सनी लिहिलं आहे की, मलाही असा नवरा आणि सासू मिळावी अशी इच्छा आहे. पुरुषांनीही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
view comments
मराठी बातम्या/Viral/
लव्ह मॅरेजनंतरचा पहिला दिवस! कपलने शेअर केला VIDEO, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं दाखवलं
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement