Budget 2025 : भारतीय बजेटचं फ्रेंच कनेक्शन; अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
- Published by:Priya Lad
Last Updated:
Budget 2025 : दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अपेक्षा असतात. यासोबतच अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक रंजक गोष्टीही समोर येतात.
नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून देशातील अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर होत आला. मोदी सरकारच्या काळात अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख मात्र, बदलली आहे. पूर्वी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या तारखेला म्हणजेच 28 किंवा 29 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जात असे. आता फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो.
दरवर्षी जानेवारीपासूनच अर्थसंकल्पाबाबत चर्चा सुरू होते. अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अपेक्षा असतात. या सोबतच अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक रंजक गोष्टीही समोर येतात. अर्थसंकल्प ज्याला इंग्रजीत बजेट असं म्हणतात. पण बजेटचा नेमका अर्थ काय, हा शब्द कुठून आला माहिती आहे का?
भारतीय अर्थसंकल्पाचा 150 वर्षे जुना इतिहास
भारतीय अर्थसंकल्पाला 150 वर्षांहून जुना इतिहास आहे. 1857च्या क्रांतीनंतर, ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा कारभार हाती घेतला. त्यानंतर 1860 मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प तयार झाला तर स्वतंत्र भारतातील पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर झाला.
advertisement
अनेक दशकांच्या या प्रवासात अर्थसंकल्पात अनेक बदल झाले आहेत. तो आता पेपरलेस आणि डिजिटलही झाला आहे. पण, अर्थसंकल्पाचा अर्थ ही अशी बाब आहे जी आजपर्यंत बदललेली नाही. सरकारची कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ म्हणजे अर्थसंकल्प, असा त्याचा अर्थ होतो. ज्याला इंग्रजीत बजेट असं म्हणतात.
advertisement
बजेटचं फ्रेंच कनेक्शन
‘बजेट’ हा इंग्रजी शब्द पण इंग्रजीतील अनेक प्रचलित शब्दांप्रमाणे तोही दुसऱ्या भाषेतून इंग्रजीमध्ये आला आहे. बजेट हा शब्द फ्रेंच शब्द bougette पासून तयार झाला आहे. Bougette हा शब्द सुद्धा Bouge शब्दावरून तयार झाला आहे. Bouge चा अर्थ ‘लेदर ब्रीफकेस’ असा होतो.
advertisement
भारताच्या अर्थसंकल्पाचं स्वरूप काळानुसार बदललं आहे. पण, अगदी अलीकडच्या काळापर्यंत भारतीय अर्थसंकल्प आणि लेदर ब्रीफकेस यांचा संबंध टिकून होता. निर्मला सीतारामन 2019 मध्ये अर्थमंत्री झाल्यानंतर हा संबंध बदलला. 2019 मध्ये त्यांनी पारंपरिक लाल ब्रीफकेसऐवजी लाल वही-खात्यातून अर्थसंकल्प सादर केला.
view commentsLocation :
Delhi
First Published :
February 01, 2025 8:58 AM IST


