Indian Railway : ट्रेन सुटली तर तिकिटाचे पैसे परत मिळणार का? काय आहेत भारतीय रेल्वेचे नियम?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आता हे पैसे कसे परत मिळवायचे आणि कोणत्या परिस्थितीत पैसे परत मिळतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्यासोबत असं घडलं तर काय करायला हवं? हे तुम्हाला कळेल.
मुंबई : भारतीय रेल्वेचा प्रवास हा सर्वांच्या खिशाला परवडणारा आहे, शिवाय हा प्रवास सोयीचा देखील आहे. जिथे प्रत्येक श्रेणीतील लोक प्रवास करु शकतात. दररोज ट्रेनने लाखो लोक प्रवास करतात. पण कधी कधी वेळेवर स्टेशनला न पोहोचल्यामुळे आपली ट्रेन चुकते. लोकल ट्रेन तर आपण दुसरी पकडू शकतो, परंतू भारतीय रेल्वेच्या लांबच्या प्रवासातील गाडी जर सुटली तर मात्र खूप मोठी पंचायत होते.
ट्रेन सुटल्यामुळे एकतर वेळेवर पोहचता येत नाही, शिवाय तिकिटीचेही पैसे वाया जातात. अनेक लोकांसोबत असा प्रकार नक्कीच घडला असेल. परंतू त्यांपैकी अनेकांना हे माहित नाही की आपली ट्रेन सुटली तरी आपल्याला तिकिटाचे पैसे परत मिळतात.
आता हे पैसे कसे परत मिळवायचे आणि कोणत्या परिस्थितीत पैसे परत मिळतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्यासोबत असं घडलं तर काय करायला हवं? हे तुम्हाला कळेल.
advertisement
तुमची ट्रेन चुकल्यास, तुम्हाला तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी ट्रेन सुटल्याच्या 1 तासाच्या आत TDR दाखल करावा लागेल.
टीडीआर ही रेल्वे प्रवाशांना दिलेली सुविधा आहे. ज्याद्वारे प्रवासी तिकिटाचे पैसे काढू शकतात. तिकीट ठेव पावती असं त्याचं फूलफॉर्म आहे.
TDR दाखल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या तिकिटाचे पैसे 60 दिवसांच्या आत परत मिळतील.
कन्फर्म तिकिटांवरच प्रवासी टीडीआर दाखल करू शकतात. TDR दाखल करण्यापूर्वी अटी आणि शर्ती वाचा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 02, 2024 10:26 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Indian Railway : ट्रेन सुटली तर तिकिटाचे पैसे परत मिळणार का? काय आहेत भारतीय रेल्वेचे नियम?









