मांजरींनी वाचवले महिलेचे प्राण, हे CCTV मध्ये कैद झालं नसतं, तर विश्वास ठेवणं ही झालं असतं कठीण

Last Updated:

व्हिडीओमध्ये एक चायनीज महिला आपल्या लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर बसून मोबाईल पाहत असते. तिच्याभोवती तीन पाळीव मांजरी वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या असतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ समोर येत असतात, पण काही दृश्यं अशी असतात जी खरंच थरकाप उडवणारी असतात. अशाच एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे, ज्यात एका पाळीव मांजरीने आपल्या मालकिणीचा जीव वाचवल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. ही घटना केवळ एखाद्या चित्रपटासारखी वाटते, पण ती खरी असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये एक चायनीज महिला आपल्या लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर बसून मोबाईल पाहत असते. तिच्याभोवती तीन पाळीव मांजरी वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या असतात. याच वेळी, टीव्ही युनिटजवळ बसलेल्या एका मांजरीला काहीतरी वेगळं जाणवतं आणि ती लगेच सतर्क होते. काही सेकंदात दुसऱ्या मांजरांचं देखील त्याकडे लक्ष जातं. काही काळ ते एक टक त्या भिंतीकडे बघू लागतात मग घाई करुन उडी मारुन त्या ठिकाणावरुन बाजूला होतात. मांजरांचं असं वागणं पाहून तिथे बसलेली महिला सतर्क होते आणि काय झालं अशी रिएक्शन देत त्या ठिकाणावरुन बाजूला होते आणि तेवढ्यात टीव्ही युनिटची भिंत खाली पडते.
advertisement
जर ती महिला तिथेच बसून राहिली असती आणि क्षणाचा जरी बिलंब झाला असता तरी गंभीर अपघात होऊ शकला असता. पण मांजरींनी वेळेवर धोका ओळखल्यामुळे महिलेचे प्राण वाचले आहे.
advertisement
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे ‘phoenixtv_news’ नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून लोकांनी मांजरींच्या संवेदनशीलतेचे कौतुक केलं आहे. एक युजर म्हणतो, "मांजरी आधीच धोका ओळखतात." तर दुसऱ्याने लिहिलं, "पाळीव मांजरी नसत्या तर मालकीण आज वाचली नसती."
हा प्रसंग सिद्ध करतो की, फक्त माणसांनाच नाही तर प्राणीमात्रांनाही धोका जाणवण्याची अद्भुत क्षमता असते.
मराठी बातम्या/Viral/
मांजरींनी वाचवले महिलेचे प्राण, हे CCTV मध्ये कैद झालं नसतं, तर विश्वास ठेवणं ही झालं असतं कठीण
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement