Chanakya Niti - जे पती-पत्नी दररोज करतात हे काम, ते लवकर म्हातारे होतात
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये अकाली वृद्धत्वाचं कारण सांगितलं आहे.
नवी दिल्ली : आचार्य चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ, कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी व अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जायचे. ते प्रचंड हुशार होते. लोक त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाले होते. त्यांना कौटिल्य असंदेखील म्हटलं जाऊ लागलं. चाणक्यनीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आचार्य चाणक्य यांच्या नीती सामान्य माणसाला जीवन जगताना आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी शिकवितात. त्यांनी सांगितलेल्या अकाली वृद्धत्वाबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊ या.
आचार्य चाणक्य यांनी एखाद्या व्यक्तीच्या कर्मापासून ते त्याच्या भविष्यापर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी कोणते लोक अकाली वृद्ध होतात आणि त्यांची कर्मं काय असतात, याबाबत सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी काही उपायही सांगितले आहेत. ते अकाली येणारं लवकर वृद्धत्व रोखण्यासाठी फायद्याचे ठरतील.
advertisement
खूप प्रवास करणारे लोक लवकर वृद्ध होतात
आचार्य चाणक्य यांच्या मते, खूप प्रवास करणारे लोक लवकर वृद्ध होतात. कारण, अशा लोकांची दिनचर्या आरोग्यदायी नसते आणि अशा लोकांना त्यांच्या आहाराचीही काळजी घेता येत नाही. म्हणजेच ज्या लोकांचं जीवन धकाधकीचं आहे त्यांनी ताबडतोब सावध झालं पाहिजे. त्यांनी आपला प्रवास कमी करून आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. नाही तर असे लोक वेळेआधीच वृद्ध होतील.
advertisement
शारीरिक सुख न मिळणारी स्त्री होते लवकर वृद्ध
चाणक्यनीतीमध्ये असं सांगितलं आहे, की ज्या महिलांना वेळोवेळी शारीरिक सुख मिळत नाही, त्या लवकर वृद्ध होतात. ज्यांना वेळोवेळी शारीरिक सुख मिळत नाही, अशा महिलांनी सावध राहायला हवं, असं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.
advertisement
बांधलेला घोडा लवकर होतो म्हातारा
चाणक्यनीतीमध्ये असा उल्लेख आहे, की जास्त काळ बांधून ठेवलेला घोडा हा अकाली म्हातारा होतो. आचार्य चाणक्य यांच्यामते घोड्याचं काम धावणं आणि कठोर परिश्रम करणं हे आहे, परंतु ते काम न करता, त्याला नेहमी बांधून ठेवलं तर तो लवकर म्हातारा होतो. घोड्याचं जे काम आहे, ते त्याला करू द्यायला हवं. त्याला सतत बांधून न ठेवता कठोर परिश्रम करू द्यायला हवेत. तरच त्याला अकाली येणारं म्हातारपण टाळता येईल.
Location :
Delhi
First Published :
February 11, 2024 4:13 PM IST