कोंबडीला पाहताच कबुतराच्या मनात झालं गुटरगू, संबंधही ठेवले, पिल्लं पाहून सगळे शॉक

Last Updated:

Kombdi-Kabutar Love Story : काही दिवसांपूर्वी मोर आणि कोंबडी, मोर आणि बदक यांच्या रोमान्सच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता कोंबडी आणि कबुतराच्या प्रेमाची चर्चा होते आहे.

News18
News18
नवी दिल्ली : प्रेम कधी कुठे कसं कुणावर होईल सांगू शकत नाही. माणसंचं नव्हे तर प्राणी-पक्षीही एकमेकांवर प्रेम करतात. गेले काही दिवस अशाच प्राणी-पक्ष्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण ते खूप धक्कादायक आहेत. कारण यात एक पक्षी दुसऱ्या प्रजातीच्या पक्ष्यावर प्रेम करताना दिसला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळे शॉक झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी मोर आणि कोंबडी, मोर आणि बदक यांच्या रोमान्सच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता कोंबडी आणि कबुतराच्या प्रेमाची चर्चा होते आहे. कोंबडी आणि कबतुराची लव्हस्टोरी दाखवणारा हा व्हिडओ तुफान व्हायरल होतो आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कोंबडी आणि कबुतर दिसत आहेत. दोघंही एकमेकांसोपत रोमँटिक पोझ देत आहेत. यानंतर पुढे त्यांची पिल्लंही दाखवण्यात आली आहेत. काही कबुतरांचे पाय कोंबडीसारखे दिसत आहेत. तर एका कबुतराला चक्क कोंबडीसारखा तुरा आहे. याला लोक हायब्रीड कोंबडी कबुतर म्हणत आहेत.
advertisement
हा व्हिडीओ पाहून यावर लोकांनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. काहींनी हे खरंच शक्य आहे का? असंही विचारलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, कोंबडी आणि कबुतराचे मिलन होणे आणि संतती होणं अशक्य आहे. कुक्कुटपालन आणि अनुवंशशास्त्र तज्ञांच्या मते, कोंबड्या गॅलस गॅलस डोमेस्टिकस आणि कबुतर कोलंबा लिव्हिया या दोन वेगवेगळ्या प्रजाती आहेत. ज्यांचे जनुकं इतकी वेगळी आहेत की त्यांना संकरित होणं शक्य नाही. कोंबड्यांमध्ये 78 गुणसूत्र असतात, तर कबुतरांमध्ये 80 गुणसूत्र असतात. या फरकामुळे त्यांचं प्रजनन अशक्य होतं.
advertisement
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की व्हिडिओमध्ये दाखवलेल्या हायब्रिड बेबीज प्रत्यक्षात कबुतरांच्या विशेष जाती आहेत, जसं की माल्टीज, मोडेना किंवा रंट कबूतर. या जाती त्यांच्या अद्वितीय स्वरूपामुळे कोंबड्यांसारख्या दिसू शकतात. उदाहरणार्थ, माल्टीज कबूतराचं डोके आणि शरीर काहीसं कोंबडीसारखे दिसतं, जे लोकांना गोंधळात टाकू शकते. काही व्हिडिओंमध्ये कबूतर कोंबड्यांशी मिलन करताना दाखवलं आहे, परंतु हे फक्त वर्तन आहे, प्रजननाचा पुरावा नाही. याव्यतिरिक्त आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अनेक प्रतिमा देखील तयार केल्या जातात. अशा परिस्थितीत हा व्हिडीओ खरा मानू शकत नाही.  devilish_zooo इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
advertisement
सूचना : हा लेख व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. यात केलेल्या दाव्याचं न्यूज18मराठी समर्थन करत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
कोंबडीला पाहताच कबुतराच्या मनात झालं गुटरगू, संबंधही ठेवले, पिल्लं पाहून सगळे शॉक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement