VIDEO : आईस्क्रिम पाहून लोकांचा चढला 'पारा'! खाणं दूर हातात घेण्याचीही हिंमत होणार नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
आईस्क्रिम थंडगार पण या आईस्क्रिमचा व्हिडीओ व्हायरल होताच तो पाहून लोकांचा पारा मात्र चढला आहे, असं या आईस्क्रिममध्ये आहे तरी काय?
नवी दिल्ली : उन्हाळा म्हटलं की आईस्क्रिम आलीच. शरीराला थंडावा मिळण्यासाठी म्हणा किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी या कालावधीत लोक आईस्क्रिम खातात. आताही आईस्क्रिम म्हणताच अनेकांच्या तोंडाला एव्हाना पाणीही सुटलं असेल. पण आईस्क्रिमचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे जो पाहून लोकांचा पारा चढला आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेते काय काय नाही करत. खाद्यपदार्थांची विक्री करणारे आपल्या काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील ज्यात काहीतरी वेगळं करण्याच्या नादात विक्रेत्यांनी खूपच विचित्र काहीतरी बनवलं आहे. ज्यामुळे त्यांना ट्रोलही व्हावं लागलं. आईस्क्रिनचा हा व्हिडीओसुद्धा असाच आहे.
advertisement
आईस्क्रिम पाहून संताप
आईस्क्रिमचे तुम्हाला कप, कोण आणि बॉक्समध्येही मिळतं. आईस्क्रिमचे प्रकारही बरेच आहेत. वेगवेगळ्या चवीची आईस्क्रिम तुम्ही चाखली असेल. पण या व्हिडीओतील आईस्क्रिम तुम्ही पाहिली तर तुम्ही खाणं दूर हातात घेण्याची किंबहुना पाहण्याचीही तुमची हिंमत होणार नाही. आईस्क्रिम पाहूनच घाम फुटेल आणि तुमचा संतापही होईल. अशी ही आईस्क्रिम आहे तरी कशी ते पाहुयात.
advertisement
अशी ही आईस्क्रिम आहे तरी कशी?
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर कोनातील ही आईस्क्रिम, ज्यावर एका लहान मुलाचं डोकं दिसत आहे आणि त्यावर रक्त. तसं हे खरं नाही ती आईस्क्रिमच आहे, पण त्याला लहान मुलाच्या डोक्याचा आकार देण्यात आला आहे. जे खूपच भयानक दिसतं आहे.
आता ही अशी आईस्क्रिम कशी काय खायची? आईस्क्रीम सर्व्ह करण्याची ही काय पद्धत आहे? असा संतप्त सवाल अनेकांनी केला आहे. ज्यांनी कुणी ही आईस्क्रिम बनवली त्याला अनेकांनी सुनावलं आहे.
advertisement
@creepycum नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये कॅप्शनमध्ये वुड्स ऑफ टेररला क्रेडीट देण्यात आलं आहे. जे अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामधील एक झपाटलेलं घर आहे.
advertisement
तुम्हाला ही आईस्क्रिम कशी वाटली, आईस्क्रिम कितीही आवडत असली तरी ही अशी आईस्क्रिम तुम्ही खाणार का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Delhi
First Published :
March 31, 2024 12:37 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : आईस्क्रिम पाहून लोकांचा चढला 'पारा'! खाणं दूर हातात घेण्याचीही हिंमत होणार नाही