Shocking! उपचार म्हणून महिलेने खाल्ले 8 जिवंत बेडुक, नंतर घडलं असं...; पाहून डॉक्टरही घाबरले
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman ate 8 live frog : कोणीतरी तिला सांगितलं की जिवंत बेडूक खाल्ल्याने पाठदुखी कमी होऊ शकते. वेदनेने हैराण झालेल्या महिलेने यावर विश्वास ठेवला आणि तिने 8 जिवंत बेडुक खाल्ले.
नवी दिल्ली : मांसाहार खाणाऱ्यांची कमी नाही. सामान्यपणे कोंबडी, बोकड यांचं मांस खाल्लं जातं. पण काही वेळा सोशल मीडियावर तुम्ही बेडकासारखे प्राणीही लोकांना शिजवून खाताना पाहिलं असेल. पण एक 82 वर्षांची महिला जिने उपचार म्हणून 8 जिवंत बेडूक खाल्ले. त्यानंतर तिची अवस्था अशी झाली की डॉक्टरही घाबरले.
चीनच्या झेजियांग प्रांतातील हांगझोऊ इथली ही विचित्र घटना. 82 वर्षांची महिला, झांग असं तिचं नाव. ती पाठदुखीने त्रस्त होती. कोणीतरी तिला सांगितलं की जिवंत बेडूक खाल्ल्याने पाठदुखी कमी होऊ शकते. वेदनेने हैराण झालेल्या झांगने यावर विश्वास ठेवला आणि तिने तिच्या कुटुंबाला काही लहान बेडूक आणायला सांगितलं. कुटुंबानेही बेडुक आणून दिले आणि तिने ते जिवंत खाल्ले.
advertisement
पण या विचित्र उपायाचा परिणाम अत्यंत धोकादायक ठरला. बेडूक गिळल्यानंतर काही वेळातच झांगला तीव्र पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवू लागली. तिला इतक्या तीव्र वेदना होत होत्या की चालताही येत नव्हतं.शरीराचे काय झाले? तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिच्या मुलाने तिला रुग्णालयात नेलं. मुलाने आईने आठ जिवंत बेडूक गिळल्याचं सांगितलं तेव्हा डॉक्टरांनाही धक्का बसला.
advertisement
झांगला ताबडतोब झेजियांग प्रांतातील हांगझोऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथं डॉक्टरांनी तिची तपासणी सुरू केली. वैद्यकीय तपासणीत असं दिसून आलं की जिवंत बेडूक खाल्ल्याने तिच्या पचनसंस्थेला गंभीर नुकसान झालं. स्पार्गनम नावाचा परजीवी तिच्या शरीरात शिरला आहे. हा परजीवी सहसा दूषित पाण्याद्वारे किंवा कमी शिजवलेल्या मांसाद्वारे शरीरात प्रवेश करतो, त्यामुळे जिवंत बेडूक गिळल्याने संसर्ग होणं असामान्य नाही.
advertisement
डॉक्टरांच्या मते, परजीवी संसर्गामुळे झांगच्या शरीरात ऑक्सिफिल पेशींची संख्या वाढली. ही स्थिती परजीवी संसर्ग, रक्त विकार आणि इतर जटिल आजार दर्शवते. जर उपचारांना थोडासाही उशीर झाला असता, तर संसर्ग शरीराच्या इतर भागात पसरू शकला असता. तिची प्रकृती आणखी बिकट झाली. सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तिची प्रकृती आता स्थिर आहे.
advertisement
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पारंपारिक श्रद्धा आणि लोककथांवर आधारित असे उपचार केवळ कुचकामीच नाहीत तर प्राणघातक देखील ठरू शकतात. तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या कोणालाही सिद्ध न झालेल्या घरगुती उपायांवर अवलंबून राहण्यापेक्षा वैज्ञानिक निदान आणि उपचार घ्यावेत.
advertisement
Location :
Delhi
First Published :
October 10, 2025 12:05 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Shocking! उपचार म्हणून महिलेने खाल्ले 8 जिवंत बेडुक, नंतर घडलं असं...; पाहून डॉक्टरही घाबरले