कारचा चेंदामेंदा, आईवडीलांचाही मृत्यू; भयंकर अपघातातही बचावली 2 मुलं, कसा झाला चमत्कार? Watch Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Car Accident News : कार ट्रकला इतक्या जोरात धडकली की ती ट्रकमध्ये अडकली. या दुर्घटनेत कपलचा मृत्यू झाला आहे. पण त्याच कारमधील दोन मुलं बचावली. ही घटना कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
अहमदाबाद : दररोज अपघाताच्या कितीतरी घटना घडत असतात. गुजरातमध्येही असाच भयंकर अपघात झाला आहे. एक ट्रक आणि कारची धडक झाली आहे. ही धडक इतकी भयंकर होती की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात कारमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघं जखमी झाले आहेत. दोन्ही जखमी लहान मुलं आहेत जी चमत्कारिकरित्या बचावली आहेत.
अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवेवरील ही घटना आहे. 10 फेब्रुवारीला सकाळी इथं अपघात झाला. एक कार एका ट्रकला धडकली. कारमध्ये चार जण होते. आईवडील आणि दोन मुलं. कार ट्रकला इतक्या जोरात धडकली की ती ट्रकमध्ये अडकली. या दुर्घटनेत कपलचा मृत्यू झाला आहे. पण त्याचवेळी एक चमत्कारही पाहायला मिळाला. अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा होऊन पती-पत्नीचा मृत्यू झाला. पण त्याच कारमधील दोन मुलं बचावली. दोन्ही मुलं या कपलचीच आहेत.
advertisement
#WATCH | अहमदाबाद, गुजरात: अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवे पर एक कार और ट्रक के बीच टक्कर होने से एक दंपत्ति की मौत हो गई और उनके दो बच्चे घायल हो गए: सफीन हसन, DCP ट्रैफिक अहमदाबाद
(सोर्स: सफीन हसन, DCP ट्रैफिक अहमदाबाद) pic.twitter.com/i7PITpkDLh
— ANI_HindiNews (@AHindinews) February 10, 2025
advertisement
अपघात झाल्यावर काय करायचं?
जगभरात दररोज लाखो रस्ते अपघात होतात. त्यात हजारो मृत्यू होतात. खरंतर बरेचजण त्या परिस्थितीत नेमकं काय करावं, हे न कळल्यामुळेच आपला जीव गमावतात. जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा ती अनुभवणाऱ्यांना अस्वस्थ व्हायला होतं. त्यावेळी नेमकं काय करावं हे ठरवण्यास ते सक्षम नसतात. मात्र मन शांत असेल तर अशी परिस्थितीदेखील अगदी व्यवस्थितरीत्या हाताळता येऊ शकते. शिवाय अपघात झाल्यानंतरची परिस्थितीदेखील व्यवस्थित सांभाळता येते. यासाठी आज आपण अपघातानंतर नेमकं काय करावं, याबाबत माहिती जाणून घेऊया.
advertisement
दुखापत तपासा : अपघातानंतर सर्वात आधी तुमच्या आणि साथीदारांच्या जखमा तपासा. कारण दुखापत झाल्यावर ताबडतोब वैद्यकीय मदत मिळणं महत्त्वाचं असतं.
advertisement
सुरक्षिततेची काळजी घ्या : अपघातानंतर शक्य असल्यास सर्वप्रथम आपलं वाहन रस्त्याच्या कडेला किंवा सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. त्यानंतर आपल्या वाहनाची लाईट सुरू करा. यामुळे पुढील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते.
अपघाताची तक्रार करा : अपघाताची तक्रार करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. असं केल्यास पोलीस मदत करू शकतात. तसंच घटनेची अधिकृत नोंद ठेवू शकतात. ही नोंद खूप महत्त्वाची असते.
advertisement
माहिती द्या : अपघातात पीडित असलेल्या सर्व व्यक्तींची नावं, संपर्क तपशील, नंबर प्लेट क्रमांक आणि विमा यासारखी महत्त्वाची माहिती शेअर करा. इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आणि कायदेशीर बाबी सोडवण्यासाठी यामुळे खूप मदत होते.
घटनास्थळाचे फोटो काढा : ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणाचे फोटो काढा. यामुळे अपघाताचं कारण, वाहनाची स्थिती आणि नुकसान इत्यादींची संपूर्ण माहिती देणं सोपं होऊ शकतं.
advertisement
काही गोष्टींवर चर्चा करू नका : कोणाच्या चुकीमुळे अपघात घडला याबाबत चर्चा करणं किंवा अपराधीपणाची कबुली देणं टाळा. तुम्हाला वाटत असलं की, तुम्ही जबाबदार आहात तरी लगेच जबाबदारी घेऊ नका. पुराव्यांच्या आधारे दोष निश्चित करण्याची जबाबदारी अधिकारी आणि विमा कंपन्यांवर सोडा.
मेडिकल इव्हॅल्युएशन : अपघातानंतर तुम्हाला बरं वाटलं, तरी एकदा तुमची वैद्यकीय तपासणी करून घ्या. कारण काही वेळा खोलवर झालेली दुखापत लगेच आढळत नाही. वैद्यकीय तपासणीची कागदपत्र सुरक्षित ठेवा, जेणेकरून नंतर गरज पडल्यास कोणतीही अडचण येणार नाही.
विमा कंपनीला कळवा : तुमच्या विमा कंपनीला अपघाताबाबत लवकरात लवकर कळवा. त्यांना योग्य तपशील देऊन इन्शुरन्स क्लेम करण्याच्या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करा.
Location :
Gujarat
First Published :
February 11, 2025 8:59 AM IST
मराठी बातम्या/Viral/
कारचा चेंदामेंदा, आईवडीलांचाही मृत्यू; भयंकर अपघातातही बचावली 2 मुलं, कसा झाला चमत्कार? Watch Video