उशीवर सिक्रेट मेसेज, डिलिव्हरी बॉयने पाहताच पोलिसांना बोलावलं, फ्लॅट उघडताच पायाखालची जमीन सरकली

Last Updated:

12 ऑगस्टला डिलिव्हरी बॉयला रस्त्याच्या कडेला संशयास्पदरित्या ठेवलेली एक उशी सापडली. रस्त्याने जाणाऱ्या अनेकांनी या उशीकडे पाहिलं, पण त्याकडे दुर्लक्ष केलं.

उशीवर सिक्रेट मेसेज, डिलिव्हरी बॉयने पाहताच पोलिसांना बोलावलं, फ्लॅट उघडताच पायाखालची जमीन सरकली (AI Image)
उशीवर सिक्रेट मेसेज, डिलिव्हरी बॉयने पाहताच पोलिसांना बोलावलं, फ्लॅट उघडताच पायाखालची जमीन सरकली (AI Image)
मुंबई : 12 ऑगस्टला डिलिव्हरी बॉयला रस्त्याच्या कडेला संशयास्पदरित्या ठेवलेली एक उशी सापडली. रस्त्याने जाणाऱ्या अनेकांनी या उशीकडे पाहिलं, पण त्याकडे दुर्लक्ष केलं. पण डिलिव्हरी बॉय या उशीच्या जवळ गेला, तेव्हा त्यालाही धक्का बसला. या उशीवर रक्ताने एक मेसेज लिहिला होता. सुरूवातीला तो घाबरला, पण काही वेळानंतर त्याने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.
विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेला हा विद्यार्थी सुट्टीमध्ये फूड डिलिव्हरी बॉयचं काम करायचा. एक दिवस ऑर्डर घेऊन जात असताना त्याचं लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या उशीवर गेलं. या उशीवर लाल रंगाने 110 625 हा क्रमांक लिहिला होता. सुरूवातीला त्याला याबाबत काही कळालं नाही, मग त्याने पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं.

समोर आलं धक्कादायक वास्तव

advertisement
पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. एक महिला तिच्याच घरामध्ये तब्बल 30 तास काहीही न खाता-पिता फोनशिवाय अडकली होती. महिला घराची सफाई करत होती, तेव्हा जोरात हवा आल्यामुळे दरवाजा बंद झाला. महिलेचा मोबाईल बाहेरच्या खोलीमध्ये होता, तसंच खोलीमध्ये टॉयलेटची सोयही नव्हती. 30 तास महिला तहान आणि भुकेने व्याकूळ झाली.
advertisement
मदतीसाठी महिलेने खिडकीला लाल सूट लटकावला, तसंच फोम बोर्डही खाली फेकले, पण कुणाचंच लक्ष गेलं नाही. अखेर तिने स्वत:चं बोट कापलं आणि रक्ताने उशीवर 110625 असा नंबर लिहून ती उशी बाहेर फेकली. डिलिव्हरी बॉयला ही उशी सापडली आणि त्याने पोलिसांना फोन केला.

महिला घरात बेशुद्ध

पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी उशी दाखवून आजूबाजूच्या इमारतींमध्ये माहिती घ्यायला सुरूवात केली. अखेर बिल्डिंग क्रमांक 6 च्या 25व्या मजल्यावर काहीतरी झाल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर पोलीस तिथे पोहोचले. दरवाजा वाजवल्यानंतरही कुणी दरवाजा उघडला नाही, अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा त्यांना महिला बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडली. 30 तास अन्न-पाण्याविना राहिल्यामुळे महिलेची शुद्ध हरपली होती. अखेर पोलिसांनी तिला शुद्धीवर आणलं त्यानंतर तिला अश्रू अनावर झाले.
advertisement
महिलेने या डिलिव्हरी बॉयला मदत केल्याबद्दल पैसे देऊ केले, पण त्याने हे पैसे नाकरले. चीनच्या सिचुआन प्रांतामध्ये ही घटना घडली आहे. महिलेने दाखवलेल्या या प्रसंगावधानाचं कौतुक केलं जात आहे, कारण महिलेने 110 625 हा नंबर लिहिला, त्यात 110 क्रमांक हा चीनमध्ये इमरजन्सी नंबर असतो, तर 625 हा क्रमांक परिसरातल्या 6 क्रमांकाच्या बिल्डिंगमधल्या 25 व्या मजल्याचा होता.
view comments
मराठी बातम्या/Viral/
उशीवर सिक्रेट मेसेज, डिलिव्हरी बॉयने पाहताच पोलिसांना बोलावलं, फ्लॅट उघडताच पायाखालची जमीन सरकली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement