Legal Rules of India : खरंच मृत्यूनंतर नॉमीनीला मिळत नाही सगळी संपत्ती? काय आहे कायदेशीर नियम
- Published by:Devika Shinde
Last Updated:
नॉमिनी म्हणजे ती व्यक्ती, जी खातेदार किंवा मालकाच्या मृत्यूनंतर त्या खात्यातील रक्कम किंवा संपत्तीचा हक्कदार ठरते. मात्र, याचा अर्थ असा नाही की नॉमिनीच त्या संपत्तीचा कायदेशीर मालक होतो.
मुंबई : आपण कोणतंही पैशाशी संबंधीत किवा प्रॉपर्टीशी संबंधीत काम करायला जातो तेव्हा आपल्या आवर्जून नॉमिनी विचारला जातो. मग ती विमा पॉलिसी असोत, बँक खातं असोत. पीएफ अकाउंट असोत किंवा आणखी काही.
नॉमिनी म्हणजे ती व्यक्ती, जी खातेदार किंवा मालकाच्या मृत्यूनंतर त्या खात्यातील रक्कम किंवा संपत्तीचा हक्कदार ठरते. मात्र, याचा अर्थ असा नाही की नॉमिनीच त्या संपत्तीचा कायदेशीर मालक होतो. खरंतर बाबत अनेकांच्या मनात गैरसमज असतात. लोकांना याचा खरा अर्थ पूर्णपणे समजलेला नाही. चला आपण कायदा समजून घेऊ.
नॉमिनी हा केवळ संपत्तीचा तात्पुरता सांभाळ करणारा असतो, तो त्या संपत्तीचा मालक नसतो. संपत्तीचा खरा मालक तोच असतो, जो मृत्यूपत्रामध्ये उत्तराधिकारी म्हणून नमूद केलेला असतो. जर मृत्यूपत्रामध्ये नॉमिनीला कायदेशीर वारसदार म्हणून घोषित केले असेल, तरच त्याला मालकीचा हक्क मिळतो. मात्र, जर मृत्यूपत्रामध्ये त्याचा उल्लेख नसेल, तर नॉमिनीला फक्त संपत्तीची जबाबदारी असते, मालकी हक्क नाही.
advertisement
नॉमिनी म्हणजे नक्की कोण?
नॉमिनी हा संपत्तीचा फक्त ट्रस्टी (विश्वस्त) असतो, तो कायदेशीर मालक नसतो. त्याचे मुख्य काम म्हणजे संपत्तीची योग्य प्रकारे देखभाल करून तिला योग्य व्यक्तीकडे सोपवणे. उदाहरणार्थ, जर पतीने आपल्या पत्नीस नॉमिनी म्हणून नमूद केले, तर ती त्या संपत्तीची केवळ देखभाल करणारी असेल, मालकी हक्कदार नाही. जर कायदेशीर वारसदार वेगळे असतील, तर संपत्ती त्यांनाच दिली जाईल.
advertisement
भारतामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी नॉमिनीविषयी कायदेशीर नियम काय आहेत? चला जाणून घेऊ.
1. बँक खाते आणि एफडी (Fixed Deposit)
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, बँक खाते किंवा एफडीचा नॉमिनी हा फक्त ट्रस्टी असतो, मालक नाही. खातेदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनी बँकेतून पैसे काढू शकतो, पण जर वसीयतीमध्ये वारसदार नमूद असेल, तर तो त्या रकमेचा खरा हक्कदार असेल.
advertisement
2. विमा पॉलिसी (Insurance Policy)
विमा अधिनियम 1938 नुसार, विमा कंपनी विमा रक्कम नॉमिनीला देते. मात्र, जर कायदेशीर वारसदार या रकमेसाठी दावा करतात, तर ती त्यांना मिळू शकते.
3. शेअर्स आणि गुंतवणूक (Shares and Investments)
कंपनी अधिनियम 2013 नुसार, शेअरहोल्डरच्या मृत्यूनंतर त्याचे शेअर्स नॉमिनीला हस्तांतरित केले जातात. पण, जर कायदेशीर वारसदारांनी दावा केला, तर न्यायालय त्यांचा निर्णय घेऊ शकते.
advertisement
4. Real Estate – फ्लॅट आणि जमीन
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की हाउसिंग सोसायटीमधील नॉमिनी हा मालक नसतो. त्याच्यावर केवळ देखभाल करण्याची जबाबदारी असते, पण कायदेशीर वारसदारच त्याचे खरे हक्कदार असतात. हिंदू उत्तराधिकार अधिनियम आणि भारतीय उत्तराधिकार कायद्यानुसार, कायदेशीर वारसदारच मालमत्तेचे खरे मालक असतात.
कायदेशीर वारसदार कोण असतात?
हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 नुसार, कायदेशीर वारसदार मुख्यतः दोन प्रकारात विभागले जातात
advertisement
प्रथम श्रेणी (Category 1) – पती/पत्नी, मुले आणि आई यांना संपत्तीवर पहिला हक्क मिळतो.
द्वितीय श्रेणी (Category 2) – जर प्रथम श्रेणीतील कोणीही हयात नसेल, तर वडील, नातू-नात, भाऊ-बहिण यांना हक्क मिळतो.
संपत्ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे?
मृत्यूपत्र तयार करा आणि त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करा की कोणत्या संपत्तीचा हक्क कोणाला मिळेल.
advertisement
नॉमिनी हा फक्त विश्वस्त आहे, हे लक्षात ठेवा आणि योग्य व्यक्तीला उत्तराधिकारी म्हणून मृत्यूपत्रामध्ये नमूद करा.
नॉमिनी हा विश्वासू आणि जबाबदार व्यक्ती असावा, जो संपत्ती योग्य हातात सोपवू शकेल.
गरज वाटल्यास वेळोवेळी नॉमिनी आणि वारसदारामध्ये बदल करण्याचा विचार करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 27, 2025 4:21 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Legal Rules of India : खरंच मृत्यूनंतर नॉमीनीला मिळत नाही सगळी संपत्ती? काय आहे कायदेशीर नियम