बाबो! दर 30 मिनिटांनी भारतातील एक कुटुंब बनतंय करोडपती, कसं काय? Wealth Report

Last Updated:

Rich people in India Wealth Report : देशातील करोडपती कुटुंबांची संख्या सातत्याने वाढत आहे.  अंदाजे दर 30 मिनिटांनी भारतात एक नवीन करोडपती कुटुंब जोडलं जात आहे, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : आपण श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण भारतात अशाच श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  मर्सिडीज  बेंझ हुरुन इंडिया वेल्थने नुकताच एक रिपोर्ट जारी केला आहे. वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार देशातील करोडपती कुटुंबांची संख्या सातत्याने वाढत आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की भारतात जवळजवळ दर 30 मिनिटांनी एक नवीन करोडपती कुटुंब जोडलं जात आहे.
अहवालानुसार ज्या कुटुंबांची एकूण संपत्ती 8.5 कोटी किंवा त्याहून अधिक आहे त्यांना करोडपती कुटुंब म्हणून वर्गीकृत केलं जातं.​​​​​​​​​​ 2021 मध्ये भारतातील करोडपती कुटुंबांची संख्या 4.58 लाख होती, तर 2025 मध्ये ती वाढून 8.71 लाख झाली आहे. याचा अर्थ असा की भारतातील करोडपती कुटुंबांची संख्या सुमारे चार वर्षांत जवळजवळ दुप्पट झाली आहे.
advertisement
राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्र 1.75 कोटी करोडपती कुटुंबांसह यादीत अव्वल आहे . त्यानंतर दिल्ली 68200 आणि बंगळुरू 31600 करोडपती कुटुंबांसह आहे. तर मुंबईत 1.42 कोटी श्रीमंत कुटुंबं आहेत . अहवालानुसार मुंबईला देशाची करोडपतींची राजधानी म्हटलं आहे.
advertisement
भारतीय करोडपती कुटुंबे शेअर्स , रिअल इस्टेट आणि सोन्यावर सर्वाधिक खर्च करत आहेत . भारतातील 50 टक्क्यांहून अधिक करोडपतींकडे आलिशान कार आहेत . याशिवाय पुरुषांसाठी रोलेक्स घड्याळे, महिलांसाठी दागिने आणि मुलांसाठी खेळणी ही सर्वात जास्त खरेदी केली जातात. 4-5 टक्के करोडपतींचे छंद प्रवास त्यानंतर वाचन आणि स्वयंपाक आहे . या संशोधनानुसार भारतीय करोडपती एमिरेट्सला त्यांची सर्वात आवडती एअरलाइन मानतात आणि ताज हॉटेलला राहण्यासाठी सर्वात आलिशान ठिकाण मानतात.
advertisement
​​​​​​​​​​​​​​​​​​मर्सिडीज बेंझ इंडियाचे सीईओ संतोष अय्यर यांच्या मते , भारताची वाढ झपाट्याने विस्तारत असलेली देशांतर्गत बाजारपेठ आणि तरुण पिढीच्या वाढत्या आकांक्षांमुळे आहे. जनरेशन झेड आता लक्झरी वस्तू खरेदी करण्यात आघाडीवर आहे.
हुरून इंडियाचे संस्थापक अनस रहमान जुनैद म्हणतात की भारतात लक्झरी कारची वाढ, अब्जाधीशांची वाढतीसंख्या आणि शेअर बाजारातील कामगिरी आणि जीडीपीचे एकाच प्रमाणात एकत्रीकरण हे भारताच्या आर्थिक वाढीच्या गतीचं प्रतिबिंब आहे .​​​​​​​​​​​​​​​​​​​​
मराठी बातम्या/Viral/
बाबो! दर 30 मिनिटांनी भारतातील एक कुटुंब बनतंय करोडपती, कसं काय? Wealth Report
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement