LG च्या एसीमधून निघतंय सोनं? व्हायरल Video पाहून लोकांमध्ये खळबळ; समोर आलं धक्कादायक सत्य
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुमच्या घरातील 20 वर्ष जुना, धूळ खात पडलेला एसी तुम्हाला अचानक 40-50 हजार रुपये देऊन गेला तर?
मुंबई : आजच्या काळात एसी (AC) म्हणजे चैनीची वस्तू राहिलेली नाही, तर ती गरजेची गोष्ट बनली आहे. उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करून घरात एसी बसवतो. पण साधारणपणे 10-15 वर्षांनंतर तो एसी जुना झाला किंवा बिघडला की आपण तो भंगारात विकून टाकतो. फार तर फार आपल्याला दोन-चार हजार रुपये मिळतात. पण कल्पना करा, जर तुमच्या घरातील 20 वर्ष जुना, धूळ खात पडलेला एसी तुम्हाला अचानक 40-50 हजार रुपये देऊन गेला तर?
ऐकायला हे एखाद्या चित्रपटातल्या कथेसारखं वाटतंय ना? पण सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओने एकच खळबळ माजवून दिली आहे. एका जुन्या एसीच्या लोगोमध्ये चक्क शुद्ध सोनं निघाल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि खरंच एसीमध्ये सोनं असतं का? चला सविस्तर जाणून घेऊया.
एसीच्या लोगोमध्ये '24 कॅरेट' सोनं?
एका सोनाराने आणि प्रसिद्ध युट्यूबर 'Ringring Unnie' ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक ग्राहक त्याच्या दुकानात काही धातूचे तुकडे घेऊन येतो. हे तुकडे दुसरे तिसरे कशाचे नसून LG (Whisen) कंपनीच्या 20 वर्ष जुन्या एसीच्या समोर लावलेल्या 'लोगो'चे (Logo) असतात.
advertisement
त्या ग्राहकाने सांगितलेली गोष्ट ऐकून दुकानदारही अवाक झाला. ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, 20 वर्षांपूर्वी जेव्हा त्याने हा एसी खरेदी केला होता, तेव्हा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की, या एसीवर असलेला लोगो खऱ्या सोन्याचा आहे. इतकंच नाही तर त्या काळात कंपनीने आपल्या जाहिरातींमध्येही याचा उल्लेख केला होता.
सोनाराने जेव्हा तुकडे वितळवले, तेव्हा...
सुरुवातीला दुकानदाराला वाटलं की हे 18 कॅरेटचं सोनं असावं किंवा फक्त सोन्याचा मुलामा असावा. पण जेव्हा त्याने ते तुकडे वितळवले, तेव्हा जे समोर आलं ते पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. तो लोगो चक्क 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा निघाला.
advertisement
त्या सोन्याची शुद्धता तपासल्यानंतर दुकानदाराने त्या ग्राहकाला फोन करून माहिती दिली की, हे सोनं अत्यंत शुद्ध आहे. त्या सोन्याच्या तुकड्यांच्या बदल्यात ग्राहकाला तब्बल 482 डॉलर्स मिळाले. भारतीय चलनात ही किंमत 43,000 रुपयांपेक्षा जास्त भरते, तर कोरियन चलनात (वॉन) ही रक्कम 7 लाख 13 हजारांच्या घरात जाते.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. ही घटना दक्षिण कोरियामधील आहे. सियोल
advertisement
लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि अनेकांनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणतो, "इतक्या पैशात तर त्या काळी नवीन एसी पण आला नसेल" दुसरा युजर लिहितो, "कंपनीने एसी विकला होता की सोन्याच्या भावात विकला होता?" तर काही जण गमतीने म्हणतात, "थांबा, मी पण आता माझ्या जुन्या एसीचा लोगो तोडून सोनाराकडे घेऊन जातो."
advertisement
जुना एसी आता झाला 'विंटेज आयटम'
या एका व्हिडिओमुळे दक्षिण कोरियामध्ये 20 वर्ष जुने एलजीचे एसी आता अचानक 'सर्वात मौल्यवान विंटेज आयटम' बनले आहेत. लोक आता आपल्या जुन्या उपकरणांकडे वेगळ्या नजरेने बघू लागले आहेत. खरं तर, पूर्वीच्या काळी काही कंपन्या आपल्या प्रीमियम उत्पादनांची शान वाढवण्यासाठी किंवा जाहिरातीसाठी अशा प्रकारे मौल्यवान धातूंचा वापर करत असत, हे या घटनेवरून पुन्हा सिद्ध झालं आहे.
advertisement
तुमच्याही घरात जर एखादा खूप जुना एसी किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असेल, तर ती भंगारात टाकण्यापूर्वी तिचा लोगो किंवा विशेष भाग एकदा नीट तपासा. कोणास ठाऊक, तुमच्या घराच्या कोपऱ्यातही एखादा 'खजिना' दडलेला असेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 10:08 PM IST
मराठी बातम्या/Viral/
LG च्या एसीमधून निघतंय सोनं? व्हायरल Video पाहून लोकांमध्ये खळबळ; समोर आलं धक्कादायक सत्य










