advertisement

बँकॉकमध्ये कपलचा 'भीगे होंठ' मुमेंट आणि बददलं संपूर्ण दृश्य, भूकंपादरम्यान टेरेस पुलचा Video पाहून भरेल धडकी

Last Updated:

भूकंपामुळे बँकोकमधील एक इमारत देखील पत्यांसारखी कोसळली असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या सगळ्यात आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओतील दृश्य ही धडकी भरवरणारं आहे.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : शुक्रवारी म्यानमारला भूकंप आला. या भुकंपाची स्केल 7.9 रिश्टर असल्याचं सांगितलं जात आहे. हा या भूकंपाची तिव्रता इतकी जास्त होती की आजूबाजूच्या देशांनाही त्याचे धक्के जाणवले. एवढंच नाही तर नोएडा आणि गाझियाबादपर्यंत जाणवले आहेत.
या भूकंपामुळे बँकोकमधील एक इमारत देखील पत्यांसारखी कोसळली असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या सगळ्यात आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओतील दृश्य ही धडकी भरवरणारं आहे.
व्हिडीओच्या सुरुवातील सगळं काही चांगलं सुरु होतं. टेरेसवरील पुलमध्ये लोक चिल करत होते. तर एक कपल एकमेकांमध्ये गुंतलं होतं. वातावरण देखील अगदी गुलाबी असल्यासारखं वाटत होत. पण पुढे असं काही घडणार याचा अंदाज कोणालाच नव्हता, ज्यामुळे एका कपलचा रोमांटिक क्षण काहीच सेकंदात एखाद्या वाईट स्वप्नासारखा समोर आला.
advertisement
तुम्ही व्हिडीओत पाहू शकता स्वीमिंग पुलमधील पाण्यात हळूहळू गोलगोल तरंग येताना दिसत आहेत आणि काही वेळाने सगळंच हादरु लागलं. यानंतर स्वीमिग पुल मधलं पाणी ही जोरजोरात हलू लागलं आणि मोठ्या लाटे प्रमाणे दिसू लागलं. हे सगळं घडताना सगळेच घाबरले आणि ते पाण्याबाहेर येऊ लागले.
हे कपल देखील घाबरलं आणि त्यांनी पाण्याबाहेर धाव घेतली. काही तरी विचित्र घडलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं पण काय घडतंय हे कोणालाच कळत नव्हतं, लोक घाबरले होते.
advertisement
हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. लोकांनी या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.
advertisement
जागतिक स्तरावर जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत भारतासह अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतात दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याशिवाय आशिया, अमेरिका आणि इतर खंडातील विविध देशांमध्येही भूकंप झाले आहेत आणि आता म्यानमारसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले गेले आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बँकॉकमध्ये कपलचा 'भीगे होंठ' मुमेंट आणि बददलं संपूर्ण दृश्य, भूकंपादरम्यान टेरेस पुलचा Video पाहून भरेल धडकी
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement