Indian Railway : ट्रेनच्या डब्यांवर का असतात वेगवेगळ्या रंगाच्या पट्या? रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना माहित असायलाच पाहिजे ही माहिती

Last Updated:

अनेकांना वाटतं या पट्ट्या केवळ सजावटीसाठी असतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या मागे एक खास उद्देश दडलेला असतो.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : भारतीय रेल्वे ही आशियातील दुसऱ्या क्रमांकाची आणि जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था आहे. दररोज लाखो प्रवासी या रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. आपल्यातील बहुतेक जणांनी रेल्वेने प्रवास केलेलाच आहे, पण ट्रेनच्या डब्यांवर रंगीत पट्ट्या का असतात हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.
अनेकांना वाटतं या पट्ट्या केवळ सजावटीसाठी असतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या मागे एक खास उद्देश दडलेला असतो.
ट्रेन डब्यांवरील रंगांचा अर्थ
पिवळ्या पट्ट्या या पट्ट्या दर्शवतात की तो डबा अपंग प्रवाशांसाठी किंवा ज्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे अशा लोकांसाठी राखीव आहे.
करड्या (ग्रे) पट्ट्या या केवळ महिलांसाठी असलेल्या डब्यांवर रंगवल्या जातात.
लाल पट्ट्या या फर्स्ट क्लास कोच दर्शवतात, ज्यांचा बॅकग्राउंडला बहुधा ग्रे रंगाची असते.
advertisement
निळे कोच हे ICF डबे असतात, जे 70 ते 140 किमी/ताशी वेगासाठी डिझाईन केलेले आहेत. हे साधारणतः मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेनमध्ये असतात.
लाल कोच हा वातानुकूलित (AC) ट्रेनसाठी, जसे राजधानी एक्सप्रेसमध्ये वापरले जातात.
हिरवे कोच हे गरीब रथ ट्रेनसाठी असतात.
तपकिरी कोच हे मीटर-गेज ट्रेनसाठी वापरले जातात.
आणखी एक रोचक माहिती
जशी या रंगीत पट्ट्या डब्यांचा प्रकार आणि उपयोग सांगतात, तसंच ट्रेनच्या पटरीवर टाकलेले दगडही खास कारणासाठीच असतात. हे दगड ट्रेनचा वेग आणि संतुलन राखण्यासाठी मदत करतात. याबद्दल फार कमी लोकांना माहित असतं.
advertisement
त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही रेल्वेने प्रवास कराल, तेव्हा ट्रेनच्या डब्यांवरील या पट्ट्या आणि रंग कोड्स पाहून त्यांचा खरा अर्थ तुम्हाला लक्षात येईल.
मराठी बातम्या/Viral/
Indian Railway : ट्रेनच्या डब्यांवर का असतात वेगवेगळ्या रंगाच्या पट्या? रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना माहित असायलाच पाहिजे ही माहिती
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement