OMG! अमेरिकेने इराणवर हल्ल्यासाठी वापरलेला B2 स्टील्थ बॉम्बर इतका महाग, फक्त एक तासाच्या खर्चात येईल BMW कार

Last Updated:

B2 stealth bombers : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर केला. हे लष्करी विमान जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान आहे.

News18
News18
नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमधील युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. 22 जून रविवारी सकाळी अमेरिकेने इराणवर हल्ला केला. अमेरिकेने या हल्ल्यांमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर केला. हे लष्करी विमान जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान आहे.
बी-2 बॉम्बर्स अमेरिकेच्या व्हाईटमन एअर फोर्स बेस, मिसूरी इथं ठेवण्यात आले आहेत. पण ते ग्वाम आणि डिएगो गार्सिया सारख्या परदेशी तळांवरूनदेखील उड्डाण करतात. बी-2 बॉम्बर्सनी 1999 मध्ये सर्बिया, 2001 मध्ये अफगाणिस्तान आणि 2003 मध्ये इराकवर हल्ला केला. 2008 मध्ये एक बी-2 बॉम्बर्स क्रॅश झाला. 2022 मध्ये झालेल्या अपघातानंतर आणखी एक बॉम्बर्स निवृत्त करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेकडे सध्या 19 बी-2 बॉम्बर्स सेवेत आहेत.
advertisement

याची खासियत काय?

हे विमान अण्वस्त्रंदेखील वाहून नेऊ शकतं. या विमानाच्या पृष्ठभागावर एक विशेष प्रकारचं साहित्य लावलं जातं. हे साहित्य रडारचे किरण शोषून घेतं. यामुळे किरणं परत जात नाहीत आणि विमान शत्रूच्या रडारला दिसत नाही. याला गुळगुळीत आणि गोल आकार दिला जातो. यामुळे कमी रडार किरणं परावर्तित होतात. जर विमानात क्षेपणास्त्रे आणि शस्त्रे ठेवली तर ती कमी दृश्यमान होतील. यामुळे विमानाचा वेग देखील वाढतो.
advertisement

याची किंमत किती?

हे लढाऊ विमान अमेरिकेने 1989 मध्ये बनवलं होतं. त्यावेळी त्याची किंमत सुमारे 737 दशलक्ष डॉलर्स होती. त्यावेळी ते जगातील सर्वात महागडे लढाऊ विमान होते. 1997 मध्ये त्यात काही बदल करण्यात आले. त्यामुळे त्याची एकूण किंमत सुमारे 2.1 अब्ज डॉलर्स झाली. आजच्या घडीला ते 4 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 350 अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत आजही ते जगातील सर्वात महागडे लढाऊ विमान आहे.
advertisement
एका तासासाठी ते उडवण्याचा खर्च 135000 डॉलर्स म्हणजे सुमारे 1.16 कोटी रुपये आहे. भारतात, बीएमडब्ल्यू कारच्या काही मॉडेल्सची किंमत एक कोटींपेक्षा जास्त आहे. दर सात वर्षांनी या विमानात 60 दशलक्ष डॉलर्सचे सुधारणा केले जातात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
OMG! अमेरिकेने इराणवर हल्ल्यासाठी वापरलेला B2 स्टील्थ बॉम्बर इतका महाग, फक्त एक तासाच्या खर्चात येईल BMW कार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement