Video : मोनालिसाच्या सौंदर्याने सारा अली खान Insecure? कुंभमेळा व्हायरल गर्लनं सांगितला शुटिंगचा 'तो' किस्सा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
शुटिंग संपवून परत आल्यानंतर अनेक पापाराझींनी आणि मीडियाने मोनालिसाची मुलाखत घेतली आणि तिच्या अनुभवाबद्दल विचारलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई : महाकुंभमेळा आता संपला आहे. पण असं असलं तरी कुंभमेळ्यात व्हायरल झालेले काही लोक अजूनही भारतीयांच्या चांगलेच लक्षात आहेत. त्यांपैकी एक म्हणजे मोनालीसा. घारे डोळे, सावळा रंग आणि शांत स्वभाव यामुळे मोनालिसा सोशल मीडियावर ट्रेंड होत होती. ती इतकी चर्चेत आली की कुंभमेळ्यात लोक तिला भेटायला आणि तिच्यासोबत फोटो घेण्यासाठी गर्दी करु लागले अखेर तिला कुंभमेळा सोडून घरी परतावं लागलं होतं.
पण या सगळ्यात मोनालिसाला एका सिनेमाची ऑफर मिळाली. ज्यामध्ये ती एका मोठ्या डायरेक्टरसोबत काम करण्याची तिला संधी मिळाली.
शुटिंग संपवून परत आल्यानंतर अनेक पापाराझींनी आणि मीडियाने मोनालिसाची मुलाखत घेतली आणि तिच्या अनुभवाबद्दल विचारलं, ज्यामध्ये मोनासिलाने सारा अली खान आपल्या सौंदर्यामुळे इन सिक्योर झाली अशापद्धतीचं वक्तव्य केलं आहे.
मोनालिसाचा एक व्हिडिओ "विजन बॉलीवुड" या इंस्टाग्राम हँडलने शेअर केला आहे. या व्हिडिओत ती तिच्या सुंदरतेची आणि तिच्या अनुभवाची स्टोरी सांगते. ती सांगते की, जेव्हा फिल्मची शूटिंग चालू होती, तेव्हा शुटिंग करताना तिला कानातील झुमके, बिंदी हटवायला सांगितलं. अगदी तिचं काजळही काढला. यावर तिला कोणीतरी विचारलं की, "असं का झालं?"
advertisement
यावर उत्तर देत मोनालिसा म्हणाली की, "त्यांना वाटलं की हिरोइनपेक्षा सुंदर तर हीच दिसतेय, मग हिरोइनला कोण पाहाणार, बहुतेक यामुळे."
तेव्हा तिला विचारलं गेलं की शूटिंगमध्ये प्रमुख हीरोइन कोण होती? त्यावर मानालिसाने सारा अली खानचं नाव घेतलं.
मोनालिसाच्या या वक्तव्यावरुन असं दिसतंय की तिला असं वाटतंय की सारा अली खानला तिच्या सौंदर्यामुळे इनसिक्योरीटी आहे. ज्यामुळे शुटिंग दरम्याने तिचे दागिने आणि काजळ सारख्या गोष्टी मोनालिसाला काढाव्या लागल्या. तसे पाहाता याबद्दल मोनालिसानं उघड वक्तव्य केलेलं नाही
advertisement
advertisement
मोनालीसाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मोनालिसाला एक सिनेमा मिळाला तर ती स्वत:ला खुप मोठी समजत असल्याचं तिला वाटतंय असं एका युजरनं म्हटलं, तर दुसऱ्यानं म्हटलं की, 'तुझं राणू मंडळ व्हायला वेळ लागणार नाही.' तर आणखी एका युजरनं लिहिलं की, 'इतक्या लवकर हवेत उडू नये.'
advertisement
मोनालिसामुळे सारा अली खान इनसिक्योर झाली का नाही हे माहित नाही. पण आपल्या या वक्तव्यामुळे मोनालिसा ट्रोल मात्र नक्की झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 05, 2025 8:17 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : मोनालिसाच्या सौंदर्याने सारा अली खान Insecure? कुंभमेळा व्हायरल गर्लनं सांगितला शुटिंगचा 'तो' किस्सा