Yuck! तरुणींच्या काखेतील घामापासून बनवला जातोय भात; लोकही चवीने खातायेत

Last Updated:

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ही डिश आता जपानमधील रेस्टॉरंटमध्येही मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वेबसाइटनुसार, हा खूप जुना नाश्ता आहे.

News18
News18
नवी दिल्ली : पदार्थ बनवता बनवता त्यात बनवणाऱ्या घाम पडणं किंवा त्याने डोक्यावरचा घाम पुसून हात झटकल्यानंतर ते पदार्थात पडणं किंवा घामाचे हात पदार्थात मिसळणं, असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात जे पाहूनच उलटी येते. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल एक असं ठिकाण जिथं घामापासूनच भात बनवला जातो आहे.
काखेत घाम आल्याने अंगाला दुर्गंधी येऊ लागते. यामुळे ते स्वच्छ करण्यासाठी किंवा घाम येऊ नये म्हणून लोक वेगवेगळे उपाय शोधत राहतात. पण एका देशात या घामाचा वापर करून एक अजब डिश बनवली जात आहे. आश्चर्य म्हणजे लोकही हा पदार्थ आवडीनं खात आहेत. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ही डिश आता जपानमधील रेस्टॉरंटमध्येही मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वेबसाइटनुसार, हा जपानचा खूप जुना नाश्ता आहे.
advertisement
ओनिगिरी नावाचा पदार्थ जपानमध्ये प्रसिद्ध आहे. हा भाताचा गोळा आहे, जो लोक लाडूसारखे हाताने बनवतात आणि खातात. पण आता या डिशमध्ये काहीतरी वेगळं केलं आहे. त्यात काखेतील घाम घालण्याची परंपरा सुरू झाली आहे, त्यामुळे याला बगल ओनिगिरी असं म्हणतात.
advertisement
कसा बनवला जातो बगल ओनिगिरी?
ज्या तरुणीच्या काखेत हा भात बनवला जाणार आहे, ती तरुणी काख स्वच्छ धुते. मग खूप व्यायाम करते, ज्यामुळे तिला घाम येतो. मग  तरुणी तिच्या काखेत भाताचा गोळा ठेवते, त्याला आकार देते आणि घामाने मऊ करते. मग ते लोकांना खायला देतात.
चवीने खातात लोक
ही डिश अनेक रेस्टॉरंटमध्ये पुन्हा चढ्या दराने विकली जात आहे. अहवालानुसार, अनेक ठिकाणी ते 10 पट अधिक महागात विकले जात आहे. एका व्यक्तीने ही डिश खाल्ली आणि सांगितलं की त्याची चव सामान्य भातापेक्षा अजिबात वेगळी नाही. अनेक रेस्टॉरंट्सनी तर त्यांच्या ग्राहकांना स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी दिली आणि ही डिश तयार केल्याचंही दाखवलं.
advertisement
2013 मध्ये एक संशोधन करण्यात आलं. ज्यामध्ये असं आढळून आलं की शरीराच्या काही भागांमध्ये तयार होणाऱ्या घामामध्ये फेरोमोन्स असतात, ज्याचा वास घेतल्यावर किंवा चाटल्यास मानवी भावना सुधारू शकतात.
मराठी बातम्या/Viral/
Yuck! तरुणींच्या काखेतील घामापासून बनवला जातोय भात; लोकही चवीने खातायेत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement