कर्मचारीकडून 1.24 कोटींच्या बांगड्या फुटल्या, पाहताच दुकानदारानं जे केलं ते पाहून सगळे थक्क
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आता तुम्ही विचार करत असाल की असं काय घडलं असेल ज्यामुळे लोक एवढी चर्चा करत आहेत? मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यासोबत काय केलं असेल? चला थोडं सविस्तर जाणून घेऊ.
मुंबई : व्यवसायात चूक झाली तर त्याची किंमत मोठी मोजावी लागते, असं आपण नेहमी ऐकतो. पण काही वेळा पैशांपेक्षा माणुसकी आणि शिकवण अधिक महत्त्वाची ठरते. चीनमधील सूझोउ (Suzhou) शहरात अशीच एक घटना घडली जिथे एका छोट्या चूकीमुळे ज्वेलरी दुकानाला कोट्यवधींचं नुकसान झालं, पण तरीही मालकाने कर्मचाऱ्याला न रागावता असं काही केलं की त्या घटनेने सोशल मीडियावर लोकांना धक्काच बसला, असं पण असतं का? किंवा असं देखील होऊ शकतं का असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थीत झाला आहे. ज्यामुळे ही गोष्ट चर्चेचा विषय ठरली.
आता तुम्ही विचार करत असाल की असं काय घडलं असेल ज्यामुळे लोक एवढी चर्चा करत आहेत? मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यासोबत काय केलं असेल? चला थोडं सविस्तर जाणून घेऊ.
ही घटना ऑक्टोबर महिन्यात एका प्रसिद्ध ज्वेलरी शॉपमध्ये घडली. दुकानातील एक तरुण सेल्समन टेबल हलवत असताना, चुकून जेडच्या (Jade) बांगड्यांचं बॉक्स खाली पडला. बॉक्स पडताच सुमारे 30 हून अधिक बांगड्यांचे तुकडे-तुकडे झाले. घडलेली संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. त्यावेळी घाबरुन दुकानातील कर्मचारी तुटलेल्या बांगड्यांचे तुकडे गोळा करत होते.
advertisement
या बॉक्समध्ये जवळपास 50 रशियन नेफ्राइट जेड बांगड्या होत्या, ज्यांची एकूण किंमत सुमारे 10 लाख युआन (भारतीय चलनात सुमारे ₹1.24 कोटी) होती. या सर्व बांगड्यांचा विमा देखील केलेला नव्हता. त्यामुळे नुकसान थेट मालक चेंग (Cheng) यांच्यावर आलं.
इतकं मोठं नुकसान होऊनही मालक चेंग यांनी कर्मचाऱ्याला एक शब्दही सुनावला नाही. उलट त्यांनी सांगितलं की, ही चूक खरंतर त्यांच्या स्वतःच्या विनंतीवरच घडली. कारण त्यांनी आणि एका ग्राहकाने दुकानातील टेबल हटवण्यास सांगितलं होतं. चेंग म्हणाले, “तो मुलगा नवीन आहे. त्याला शिक्षा देण्यापेक्षा मी त्याला समजावलं की, प्रत्येक चूक एक शिकवण असते.”
advertisement
याचबरोबर त्यांनी ठरवलं की तुटलेल्या बांगड्या फेकून न देता दुकानातच सजावटीसाठी ठेवाव्यात, जेणेकरून ही घटना कायम लक्षात राहील आणि सर्वांना संयम आणि जबाबदारीचं महत्त्व कळेल. ही संपूर्ण घटना चीनमधील आहे.
घटनेच्या वेळी दुकानात प्रसिद्ध चीनी अभिनेता तान काई (Tan Kai) देखील उपस्थित होते. त्यांनीच व्हिडिओ शूटसाठी टेबल हटवण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनाही या घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वत: घेतली. त्यांनी सांगितलं, “जर मी टेबल हलवायला सांगितलं नसतं, तर हे घडलं नसतं. आता मी विचार करतोय की या तुटलेल्या जेडपासून काही सुंदर वस्तू बनवून नुकसान कमी कसं करता येईल.”
advertisement
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, लोकांनी मालक चेंग यांच्या समजूतदारपणाचं आणि माणुसकीचं कौतुक केलं. चीनी प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ 30 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला. अनेकांनी सुचवलं की तुटलेल्या जेडच्या तुकड्यांपासून बीड्स, नेकलेस किंवा ब्रेसलेट बनवून पुन्हा विक्री करावी म्हणजे नुकसानाचं रूपांतर सुंदर संधीमध्ये होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 9:43 PM IST
मराठी बातम्या/Viral/
कर्मचारीकडून 1.24 कोटींच्या बांगड्या फुटल्या, पाहताच दुकानदारानं जे केलं ते पाहून सगळे थक्क


