Kitchen Jugaad Video : कंगवा ठेवा दारात, उंदीर बिलकुल येणार घरात

Last Updated:

Comb keep rats away : कंगव्याचा असा वापर जो तुम्ही आयुष्यात पाहणं दूर कधी विचारही केला नसेल. कंगव्याने चक्क उंदीर पळवता येतात. कंगव्यामुळे उंदरापासून सुटका मिळेल.

AI Generated Image
AI Generated Image
नवी दिल्ली : कंगवा आपण कशासाठी वापरतो, तर साहजिकच केस विंचरण्यासाठी पण तुम्ही कधी कंगव्याने उंदरांना पळवलं आहे का? कंगव्याचा असा वापर जो तुम्ही आयुष्यात पाहणं दूर कधी विचारही केला नसेल. कंगव्याने चक्क उंदीर पळवता येतात. कंगव्यामुळे उंदरापासून सुटका मिळेल. या जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
उंदरांना घरातून बाहेर पळवण्यासाठी आपण काय काय नाही करत. पण एखाद्या उंदराला घराबाहेर काढलं की दुसऱ्यादिवशी घरात उंदीर दिसतोच तो कुठून आलेला असतो काय माहिती नाही. पण उंदरांपासून सुटका काही मिळत नाही. आता कंगव्याने उंदीर पळवून पाहा. एका महिलेने हा जुगाड दाखवला आहे.
एक चमचा चण्याची डाळ घ्या, त्यात, कोणत्याही एक्स्पायर झालेल्या औषधाच्या एका गोळीची पूड करून टाका. देशी घी घ्या. यामुळे उंदीर आकर्षित होतील आणि उंदारांना गोळीचा वासही येणार नाही. नंतर यात बेकिंग सोडा, गव्हाचं पीठ आणि थोडं पाणी टाकून मिश्रण बनवून घ्या.
advertisement
आता खराब झालेला प्लॅस्टिकचा कंगवा, प्लॅस्टिकचं एखादं झाकण, कापूस किंवा पेपर घ्या. कापसाचे छोटे छोटे तुकडे करून तयार केलेलं मिश्रण या कापसावर लावा.   जिथं उंदीर असतात तिथं मिश्रण लावलेलं कापूस ठेवा. उंदीर नेमके कुठून येतात तिथं हे मिश्रण ठेवा. किचनवर, सोफ्याच्या खाली, बेडखाली, कपाटाखाली, दरवाज्याच्या मागे. जर तुमच्या घरातील उंदरांनी प्लॅस्टिक कुरतडलं असेल तर प्लॅस्टिकचा वापर करा. डब्याचं झाकण घेऊन त्यावर मिश्रण ठेवलेलं कॉटन ठेवून द्या.  आता यात कंगव्याचा वापर कुठे आहे, असं तुम्ही म्हणाल. तर कंगव्यावरसुद्धा ही पेस्ट लावून घ्या आणि मुख्य दरवाजा ज्याच्याखाली थोडी गॅप असते तिथं हा ठेवा.
advertisement
हे मिश्रण थोडं जरी उंदरांच्या पोटात गेलं तरी काम करणं सुरू करेल. तूप, गव्हाचं पीठ असल्याने हे मिश्रण उंदरांना आकर्षिक करेल. तर औषधाची गोळी आणि बेकिंग सोड्यामुळे उंदरांना अस्वस्थ वाटेल आणि ते घराबाहेर पळून जातील असा दावा महिलेने व्हिडीओत केला आहे.
advertisement
Avika Rawat Foods युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड पाहाल तर तुम्हीसुद्धा कराल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : कंगवा ठेवा दारात, उंदीर बिलकुल येणार घरात
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement