महाराष्ट्रात कोरियन ब्लॉगरसोबत तरुणाचं गैरवर्तन, Viral Video मुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक कोरीयन महिला भारतात व्लॉगिंग करण्यासाठी आली होती. पण महाराष्ट्रात या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला.
मुंबई, 19 डिसेंबर : हल्ली सोशल मीडियावर व्लॉगिंगचा ट्रेंड आला आहे. ज्यामुळे बहुतांश लोक हे नवनवीन ठिकाणी फिरायला जातात आणि त्या ठिकाणचा आपला अनुभव सांगतात. यासाठी अनेक लोक परदेशात ही प्रवास करतात. भारतातील काही मंडळी भारताबाहेर जातात. तर काही बाहेरील लोक भारतात येतात.
एक कोरीयन महिला भारतात व्लॉगिंग करण्यासाठी आली होती. पण महाराष्ट्रात या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. शिवाय नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दक्षिण कोरियन व्लॉगर केली महाराष्ट्रात स्थानिकांशी संवाद साधत असताना व्हिडीओ रेकॉर्ड करत होती. तेव्हा एका व्यक्तीकडून अप्रिय घटना घडली. तेव्हा ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून ती क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे.
advertisement
ही घटना घडली जेव्हा केली एका मार्केटमध्ये स्थानिक लोकांसोबत ही महिला नारळ पाणी पित होती. व्हिडीओमध्ये ती एका दुकानात दुकानदार आणि ग्राहकांशी बोलताना दिसत आहे. अचानक एक माणूस येऊन तिला पकडतो. तो तिच्या गळ्यात हात ठेवतो आणि कॅमेराकडे पाहतो.
इतक्यात तिच्या शेजारी दुसरा माणूस येऊन उभा राहतो, पुढे या महिलेच्या गळ्यात हात घातलेली व्यक्ती म्हणते की, "इतके लांब उभे राहू नका. असेच धरून ठेवा." तेव्हा या महिलेनं स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न केला तरीही तो तिला धरून ठेवत होता. हे सगळं घडत असताना महिला अस्वस्थ असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. पुढे ही महिला म्हणते, “मला येथून पळावे लागेल”. ती शक्य तितक्या लवकर निघून जाते आणि म्हणते, "त्यांना मिठी मारायला खूप आवडते."
advertisement
पोलिसांनी अद्याप या व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गेल्या वर्षी मुंबईत एका दक्षिण कोरियाच्या महिलेचा लाइव्ह स्ट्रिमिंग करत असताना तिचा छळ केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. ऑनलाइन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, एक आरोपी युट्यूबरला तिच्या हाताने ओढताना दिसत आहे कारण ती “नाही, नाही” असे ओरडते. ही घटना खारमध्ये घडली. तिने विरोध करत असतानाही तो माणूस तिच्या जवळ जाऊन तिचा हात धरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2023 8:11 AM IST
मराठी बातम्या/Viral/
महाराष्ट्रात कोरियन ब्लॉगरसोबत तरुणाचं गैरवर्तन, Viral Video मुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त









