OMG! 1000 वेळा फ्रीमध्ये मागवलं तब्बल 21,00,000 रुपयांचं फूड, पठ्ठ्याने काय केला जुगाड?

Last Updated:

Free online food : 21,00,000 रुपयांचे पदार्थ फ्रीमध्ये... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हे कसं शक्य आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही असेल. 

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : हल्ली बरेच लोक ऑनलाईन फूड ऑर्डर करतात. यावेळी तुम्ही पाहिलं असेल की तिथं ऑफर्सही असतात. ज्यात एकावर एक फ्री, फर्स्ट ऑर्डर फ्री अशा सवलती असतात. पण या ऑफर्स काही पैशांच्या किंवा काही कालावधीसाठी असतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही एका व्यक्ती तब्बल 21,00,000 रुपयांचे पदार्थ फ्रीमध्ये मागवले आहेत.
21,00,000 रुपयांचे पदार्थ फ्रीमध्ये... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हे कसं शक्य आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही असेल. जपानमधील हे प्रकरण आहे. नागोया इथं राहणारी 38 वर्षांची ही व्यक्ती, बेरोजगार होती. या व्यक्तीने एकदा-दोनदा नव्हे तर 1000 पेक्षा जास्त वेळा फ्री फूड मागवलं. त्याने स्वस्त स्नॅक्सऐवजी ईल बेंटो, हॅम्बर्गर स्टेक आणि आईस्क्रीम सारख्या महागड्या वस्तू ऑर्डर केल्या. ज्याची किंमत 21,30,000 रुपये आहे. आता हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
खरंतर या व्यक्तीने तब्बल दोन वर्षे डिलिव्हरी अॅप डेमा-कॅनच्या रिफंड पॉलिसीचा गैरवापर केला. त्याने अॅपमधील सिस्टम त्रुटीचा फायदा घेत जेवणाचा पुरेपूर आनंद लुटला. त्याने 124 बोगस अकाऊंट तयार केले. प्रत्येकी एक नवीन नाव आणि खोटा पत्ता. त्याने प्रीपेड मोबाइल सिम कार्ड खरेदी केले, खोटे कागदपत्रे सादर केली आणि ओळख टाळण्यासाठी खाती हटवली.
advertisement
ही व्यक्ती ऑनलाईन फूड ऑर्डर करायची आणि तिला ते मिळतही असे. पण आपल्याला ऑर्डर मिळाली नाही अशी तक्रार करून रिफंड मागायचा. अशा पद्धतीने तो फ्री पदार्थ खात होता. 30 जुलै रोजी त्याने एक नवीन खातं तयार केलं आणि आईस्क्रीम आणि चिकन स्टेक ऑर्डर केलं. डिलिव्हरी मिळाल्यानंतरही त्याने 16000 येन म्हणजे सुमारे 9000 रुपये परत करण्याची विनंती केली. पण यावेळी कंपनीचा संशय निर्माण झाला आणि चौकशीत सत्य उघड झालं. कंपनीने म्हटलं की ते आता त्यांची आयडी पडताळणी प्रणाली कडक करेल आणि संशयास्पद व्यवहार सूचना प्रणाली लागू करेल.
advertisement
सोशल मीडियावरील लोक याला एक स्मार्ट पण लज्जास्पद स्कॅम म्हणत आहेत. एका युझरने लिहिलं, "जर त्याने एवढी बुद्धी वापरली असती तर त्याला नोकरीही मिळू शकली असती."
view comments
मराठी बातम्या/Viral/
OMG! 1000 वेळा फ्रीमध्ये मागवलं तब्बल 21,00,000 रुपयांचं फूड, पठ्ठ्याने काय केला जुगाड?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement