लग्नाच्या पहिल्या रात्री घडलं नको ते, नवरा-बायको एकत्र झोपले, सकाळी उठताच पती रडत रडत आईकडे पळाला!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Shocking News: लग्न हे प्रत्येक व्यक्तीसाठी आणि कुटुंबियांसाठी खूप खास असतं. लग्नाची पहिली रात्र नवविवाहित जोडप्यासाठी तर आणखीनच खास असते. मात्र एका पतीसाठी ही भयानक ठरली.
मुंबई: लग्न हे प्रत्येक व्यक्तीसाठी आणि कुटुंबियांसाठी खूप खास असतं. लग्नाची पहिली रात्र नवविवाहित जोडप्यासाठी तर आणखीनच खास असते. मात्र एका पतीसाठी ही भयानक ठरली. घरात आनंदाचं वातावरण, फुलांनी सजलेली खोली, नववधूच्या स्वागतासाठी उभं राहिलेलं संपूर्ण कुटुंब आणि नव्या जीवनाची स्वप्नं उराशी बाळगलेला नवरा… पण दुसऱ्या दिवशी जे घडलं, त्यानं या साऱ्याच स्वप्नांना अचानक हादरा दिला.
लग्नाच्या रात्री झोपून दुसऱ्या दिवशी उठलेल्या नवऱ्याने जे पाहिलं त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. त्याने रडत रडत आईला हाक मारायला सुरुवात केली. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
रियाणातील रेवाडी गावातील हा प्रकार 'लग्न' या पवित्र बंधनाच्या नावाखाली घडलेली एक फसवणूक. रात्रभर नवविवाहित जोडीने एकमेकांसोबत वेळ घालवला, पण सकाळ झाली तेव्हा वधू बेपत्ता होती. तिच्यासोबत घरातील सगळे दागदागिने आणि रोकडही गायब होती. या घटनेनंतर नवरदेव थेट रडत आईकडे धावला आणि म्हणाला, "आई, ती बेडरूममध्ये नाहीय!"
advertisement
दरम्यान, जलदीप नावाच्या व्यक्तीसोबत ही घटना घडली. या धक्कादायक प्रकारानंतर त्याच्या वडिलांनी नी रेवाडीच्या बावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिकारी एसआय सुरेंद्र यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वधू आणि आरोपी मध्यस्थांचा शोध घेतला जात आहे. पीडितेने दिलेल्या पत्त्यावरही पोलिस छापा टाकतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 19, 2025 8:22 PM IST
मराठी बातम्या/Viral/
लग्नाच्या पहिल्या रात्री घडलं नको ते, नवरा-बायको एकत्र झोपले, सकाळी उठताच पती रडत रडत आईकडे पळाला!