'सपने में मिलती है'; 20 वर्षांपूर्वी हरवलेल्या महिलेचा स्वप्नात मिळाला पत्ता आणि... सिनेमापेक्षा कमी नाही रिअल लाइफ कहानी

Last Updated:

इथे तब्बल 20 वर्षांपूर्वी बेपत्ता असलेली एक महिला एका स्वप्नामुळे सापडली. हो, तुम्ही बरोबर वाचलंत एका स्वप्नामुळे!

Ai Generted Photo
Ai Generted Photo
मुंबई : कधी कधी खरी घटना ही सिनेमा, मालिका किंवा कादंबरीपेक्षाही जास्त नाट्यमय वाटते. मानवी जीवनात घडणाऱ्या काही घटना इतक्या विलक्षण असतात की आपण त्यावर विश्वास ठेवायचा की नाही, हेच कळत नाही. असंच काहीसं घडलं एका महिलेच्या बाबतीत, ज्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा केली जात आहे. इथे तब्बल 20 वर्षांपूर्वी बेपत्ता असलेली एक महिला एका स्वप्नामुळे सापडली. हो, तुम्ही बरोबर वाचलंत एका स्वप्नामुळे! पण वाईट गोष्ट अशी की ही महिला जिवंत नव्हती.
20 वर्षांपूर्वी कहानीला सुरुवात
24 सप्टेंबर 2005 रोजी 35 वर्षीय मिशेल वानेक (Michelle Vanek) आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कोलोराडोमधील क्रॉस माऊंटन (Colorado’s Cross Mountain) या डोंगरावर ट्रेकसाठी गेली होती. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण चढाईदरम्यान मिशेलला अचानक उंचीचं आजारपणं (altitude sickness) जाणवू लागलं. थकवा आणि श्वास घेण्यास त्रास जाणवल्याने त्या एका ठिकाणी थांबल्या आणि मित्र मात्र पुढं चढाईसाठी निघून गेले.
advertisement
पण जेव्हा मित्र पुन्हा खाली उतरले, तेव्हा मिशेल तिथे नव्हत्या. तिला तासन्‌तास शोधलं पण ती काही दिसली नाही, त्यानंतर तिचे मित्र पुन्हा उतरुन खाली निघून आले. पण मिशेल घरी पोहचली नव्हती दिवस गेले, आणि नंतर वर्षानुवर्षं... पण मिशेलचा कुठलाही ठावठिकाणा सापडला नाही.
मिशेलच्या पती बेन (Ben) आणि कुटुंबियांसाठी हे दुःख शब्दात मांडणंही कठीण आहे. त्यांनी तिचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. स्थानिक पोलिस, रेस्क्यू टीम, स्वयंसेवक सगळ्यांनी अथक मेहनत घेतली, पण प्रत्येकवेळी निराशाच हाती लागली. काळ सरत गेला, पण मिशेलचं नाव कायम "मिसिंग पर्सन" लिस्टमध्येच राहिलं.
advertisement
स्वप्नातून मिळाला धागा
मात्र, 2023 मध्ये ही कहाणी अचानक वळण घेते. मिशेलचा शोध घेणाऱ्या एका व्यक्तीला एके रात्री विलक्षण स्वप्न पडलं. त्या स्वप्नात त्याला असं जाणवलं की, महिलांची एक स्वतंत्र शोध पथक (search team) तयार झालं, तर मिशेलचा काहीतरी माग सापडेल. स्वप्नं खरी होतात की नाही, हा वेगळा प्रश्न. पण या व्यक्तीने ते स्वप्न मनावर घेतलं. त्याने खरोखरच एका महिला शोध पथकाची उभारणी केली. ही टीम पुन्हा एकदा क्रॉस माऊंटनवर गेली, जिथं मिशेल हरवली होती.
advertisement
आणि मग, जवळपास २० वर्षांनंतर, त्या डोंगराच्या खाईत त्यांना एक कंकाल, कपडे, एक बॅकपॅक आणि एक नेकलेस सापडला. हे सर्व अवशेष पाहून टीम हादरली. तपासासाठी सगळं पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं. ओळख पटवण्यासाठी मिशेलचा पती बेन यांना बोलावण्यात आलं. त्यांनी क्षणातच त्या नेकलेसकडे पाहून सांगितलं की "हे मिशेलचंच आहे."
सिनेमासारखी कहाणी
19 वर्षं एखादी व्यक्ती बेपत्ता असणं आणि मग एका स्वप्नाच्या आधारे तिचा शोध लागणं, ही कहाणी खरी की काल्पनिक यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. पण ही घटना खरी आहे. मिशेलच्या कुटुंबाला जरी हवी तशी सुखांतिका (happy ending) मिळाली नाही, तरी निदान इतकं समाधान नक्की मिळालं की तिला काय झालं आणि ती या जगात आहे की नाही हे कळलं.
advertisement
ही घटना आपल्याला दोन गोष्टी शिकवते. एक म्हणजे निसर्ग किती अनिश्चित आहे आणि त्याच्यासमोर माणूस किती असहाय्य आहे आणि दुसरं म्हणजे आशा कधीही संपवू नये. कदाचित स्वप्नं हे केवळ कल्पना नसतात, काहीवेळा ती वास्तवात बदलून अनपेक्षित उत्तरंही देऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
'सपने में मिलती है'; 20 वर्षांपूर्वी हरवलेल्या महिलेचा स्वप्नात मिळाला पत्ता आणि... सिनेमापेक्षा कमी नाही रिअल लाइफ कहानी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement