Hello Guys! मी बबलू, माकडाचं Vlog पाहून नेटकरीही हैरान, लाखो वेळा पाहिला गेला Video
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सध्या एक असं पात्र चर्चेत आलं आहे जे माणूस नसून… माकड आहे. होय, या माकडाचं नाव आहे ‘बबलू बंदर’ आणि तो आज सोशल मीडियाचा नवा सुपरस्टार ठरला आहे.
मुंबई : आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेत प्रत्येकाला स्टार बनायचं स्वप्न असतं. कोणी नाचून, कोणी विनोद करून, तर कोणी फॅशन किंवा ट्रॅव्हल व्हिडिओ करून लोकांचं लक्ष वेधून घेतं. इंटरनेटवर रोज कोट्यवधी लोक नवीन कंटेंट पाहतात आणि शेअर करतात. पण, सध्या एक असं पात्र चर्चेत आलं आहे जे माणूस नसून… माकड आहे. होय, या माकडाचं नाव आहे ‘बबलू बंदर’ आणि तो आज सोशल मीडियाचा नवा सुपरस्टार ठरला आहे.
कोण आहे ‘बबलू बंदर’?
‘बबलू बंदर’ हा कुठलाही खरा माकड नाही, तर AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) द्वारे तयार केलेला एक व्हर्च्युअल कॅरेक्टर आहे. पण त्याची स्टाईल, त्याचं बोलणं आणि त्याची देसी अॅटिट्यूड पाहून लोक म्हणतात "हा तर अगदी आपल्या सारखाच आहे."
बबलू स्वतःला “ट्रॅव्हल ब्लॉगर” म्हणवतो आणि भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरून व्हिडिओ बनवतो. त्याचं उद्दिष्ट आहे भारताची संस्कृती, अन्न, आणि ठिकाणं देसी अंदाजात दाखवणं.
advertisement
बबलूचा सगळ्यात मोठा USP म्हणजे त्याची बोली किंवा बोलण्याची पद्धत. तो हिंदी आणि स्थानिक भाषांचा मिलाफ करून बोलतो. तो कधी बिहारी टोनमध्ये, कधी मराठी स्टाईलमध्ये, तर कधी पंजाबी अंदाजात बोलतो. त्याचे व्हिडिओ फक्त प्रवास दाखवत नाहीत, तर त्यात हलकी-फुलकी कमेंटरी असते, जी ऐकून हसू आवरत नाही.
advertisement
सोशल मीडियावर बबलूचा धुमाकूळ
दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये चाट खाताना, गोव्याच्या बीचवर सनग्लास लावून आराम करताना किंवा हरिद्वारमध्ये गंगेत उडी घेताना बबलू प्रत्येक ठिकाणी देसी स्टाईलमध्ये धमाल करताना दिसतो. त्याचे व्हिडिओ इतके व्हायरल झाले आहेत की, एका व्हिडिओला तब्बल 10 कोटी व्ह्यूज आणि 80 लाख लाईक्स मिळाले आहेत.
लोकांना वाटलं होतं हा कुठला मजेशीर एडिट केलेला व्हिडिओ असेल, पण नंतर समजलं की हा एक संपूर्ण AI जनरेटेड इन्फ्लुएंसर आहे. म्हणजेच बबलू बंदर हा आभासी जगातला भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगर आहे, जो आपल्या देसी अंदाजाने जगभरातील लोकांना हसवत आणि भारत दाखवत आहे.
advertisement
कंटेंटच्या गर्दीत बबलूने दाखवून दिलं की, सर्जनशीलता कुठेही आणि कोणत्याही रूपात व्यक्त होऊ शकते. अगदी एका “माकडाच्या व्लॉग”मधूनही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 23, 2025 4:07 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Hello Guys! मी बबलू, माकडाचं Vlog पाहून नेटकरीही हैरान, लाखो वेळा पाहिला गेला Video


