VIDEO : आई जो जो गं! डोळ्यावर झोप, हातही दुखला, तरी मेट्रोत गाढ झोपलेल्या आईचा आधार बनला चिमुकला

Last Updated:

Mother Son Video : प्रत्येक मुलाचं आपल्या आईवर प्रेम असतं. पण आईवरआईसारखं प्रेम क्वचितच कोणती मुलं करत असतील. असाच हा हृदयस्पर्शी व्हिडीओ. ज्यात एक चिमुकला आपल्या आईसाठी आई बनला आहे.

News18
News18
नवी दिल्ली : बाळा जो जो रे असं अंगाई गीत गात आई आपल्या बाळाला झोपवते. अगदी मूल कितीही मोठं झालं तरी आई कधी ना कधी त्याला आपल्या मांडीवर घेऊन झोपवते किंवा किमान त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. आईचं मुलांवरील प्रेम तर आपण पाहतोच. पण आता एका मुलाचं आईवरील असं प्रेम, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
प्रत्येक मुलाचं आपल्या आईवर प्रेम असतं. पण आईवरआईसारखं प्रेम क्वचितच कोणती मुलं करत असतील. असाच हा हृदयस्पर्शी व्हिडीओ. ज्यात एक चिमुकला आपल्या आईसाठी आई बनला आहे. आईवर आईसारखं प्रेम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण भावुक झाला आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा असा हा व्हिडीओ आहे.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक महिला आणि तिच्या शेजारी बसलेला मुलगा. हे मायलेक मेट्रोने प्रवास करत आहेत. महिलेला गाढ झोप लागली आहे. महिला खूप थकलेलेली दिसते आहे. थकून प्रवासा झोपणारी महिला तशी आपल्यासाठी काही नवीन नाही. कामावर जाताना किंवा कामावरून घरी परतताना हे दृश्य आपण पाहतोच. पण जेव्हा त्यांना गाढ झोप लागते आणि डुलकी लागते तेव्हा त्यांना तिथं सावरणारं कुणी नसतं. डुलकी लागली की त्यांची झोपमोड होते आणि त्यांना स्वतःच स्वतःला सावरावं लागतं किंवा गाडी वेगात असेल तर कुठेतरी डोकं आपटतं. इथंच हा मुलगा आपल्या आईसाठी आधार बनला आहे.
advertisement
तुम्ही पाहाल तर त्याने आपल्या आईभोवत हात ठेवला आहे. एक हात मागून आणि एक हात पुढून धरला आहे. मागील हात त्याने बाजूच्या रॉडवर ठेवला आहे, जेणेकरून आईचं डोकं तिथं आपटू नये आणि एक हात पुढे ठेवला आहे, जेणेकरून आईला डुलकी लागून तिचा तोल जाऊ नये.
त्या मुलालाही झोप आली आहे, त्याच्या डोळ्यात झोप स्पष्टपणे दिसून येते. मधेच थोडा वेळ तो डोळे झाकलेलाही दिसतो. त्याचे चिमुकले हात एकाच स्थितीत ठेवल्याने दुखू लागले आहेत. जे तो काढून किंचित झटकतो आणि पुन्हा आईसमोर धरून ठेवतो.
advertisement
आईही अगदी शांतपणे झोपली आहे. तिला मधेच जाग येते. पण तरी म्हणावी तशी ती पूर्णपणे उठलेली नाही. पुन्हा तिचे डोळे बंद होतात. आईला जाग आली म्हणून मुलगाही लगेच तिला उठवतो असं नाही. तर तो तसाच शांत राहतो जेणेकरून आईची झोपमोड नको, तिला पुन्हा शांत झोप लागूदे.
advertisement
जवळपास तब्बल 4 मिनिटांचा तर फक्त हा व्हिडीओ आहे. हा चिमुकला यापेक्षा कितीतरी वेळ आपल्या आईसाठी आधार बनला असेल.
@Anwarali_0A एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पण व्हिडीओने सगळ्यांचं मन जिंकलं आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट आहेत. मुलाचं आईवरील हे असं प्रेम पाहून सगळे भावुक झाले आहेत. मुलाचं कौतुक केलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : आई जो जो गं! डोळ्यावर झोप, हातही दुखला, तरी मेट्रोत गाढ झोपलेल्या आईचा आधार बनला चिमुकला
Next Article
advertisement
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं, मुलीही ऐकून रडतात
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं
    View All
    advertisement