Shocking! यांना झालंय काय? 95 विद्यार्थिनींची एकाच वेळी भयंकर अवस्था पाहून शिक्षकांनाही फुटला घाम; VIDEO VIRAL
- Published by:Priya Lad
Last Updated:
शालेय विद्यार्थिनींचा हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
नैरोबी, 06 ऑक्टोबर : काही वेळा असं काही तरी घडतं की त्यावर विश्वास ठेवणं मुश्किल होतं. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात एकाच शाळेतील तब्बल 95 विद्यार्थिनींची एकाच वेळी अशी अवस्था झाली की पाहून शिक्षकांनाही घाम फुटला. या मुलींना एकाच वेळी एकत्र लकवा मारला आणि त्या लंगडत चालू लागल्या.
लंगडत चालणाऱ्या या विद्यार्थिनींच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सर्व मुलींची अवस्था सारखीच आहे. त्यांना पायातून लकवा मारला आहे. सर्वजण तशाच चालत आहेत. कुणी एकमेकींना धरून तर कुणी भिंतीचा आधार घेत चालत आहे. माहितीनुसार पूर् आफ्रिकेच्या केनियातील सेंट थेरेसा एर्गी हायस्कूलमधील हे दृश्य असल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
सोशल मीडिया पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या मुलींच्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे अपंग झाला आहे. स्थानिक मीडिया आउटलेट्सने दिलेल्या माहितीनुसार. मुलींचे पाय अचानक सुन्न झाले आणि स्थिर झाले. गेल्या काही आठवड्यांपासून या मुली रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची अवस्था पाहून त्यांचं कुटुंब आणि इतर सर्व लोकही घाबरले आहेत.
advertisement
काकामेगा काउंटी हेल्थ सीईसी बर्नार्ड वेसोंगा यांनी पत्रकारांना सांगितलं की, या अज्ञात आजाराचं कारण समजून घेण्यासाठी मुलींचे रक्त, मूत्र आणि स्टूलचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. ते चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे, असं वृत्त आज तकने दिलं आहे.
advertisement
@PrinceCarlton या X अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
VIDEO: A significant number of students from St. Theresa's Eregi Girls High School in Kenya have been admitted to the hospital due to an unexplained ailment. The majority of these girls are reportedly experiencing paralysis in their legs, leaving them incapable of walking. #kenya pic.twitter.com/1sPuMbIzPH
— Prince Carlton (@PrinceCarlton) October 5, 2023
advertisement
या मुलींना काय झालं असावं, असं तुम्हाला वाटतं? याबाबत तुम्हाला काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 06, 2023 3:42 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Shocking! यांना झालंय काय? 95 विद्यार्थिनींची एकाच वेळी भयंकर अवस्था पाहून शिक्षकांनाही फुटला घाम; VIDEO VIRAL


