Shocking! पृथ्वीला वाचवणारं नासाचं मिशन बंद; आता काय होणार? पृथ्वी संकटात?

Last Updated:

2009 मध्ये सुरू करण्यात आलेले नासाचं हे मिशन. गेली 14 वर्षे पृथ्वीचं रक्षण करत होता, पण ते 31 जुलै रोजी बंद झालं. त्यामुळे आता पृथ्वीचं रक्षण कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

News18
News18
नवी दिल्ली :  एक दिवस पृथ्वीचा अंत होणार असं म्हटलं जातं. पण कधी आणि कसा याबाबत बरेच दावे केले जातात. पण आता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, यानंतर पृथ्वीचा अंत आता जवळ आला की काय अशी भीती वाटू लागली आहे.
तशी पृथ्वीच्या दिशेने अंतराळातून संकट येतच असतात. पण पृथ्वीवर ते येत नाही. याचं कारण म्हणजे नासाचं एक मिशन, जे आजवर पृथ्वीचं रक्षण करत आलं आहे. पण आता पृथ्वीला वाचवणारं नासाचं हेच मिशन बंद झालं आहे. ते आहे NEOWISE.
काय आहे NEOWISE?
NEOWISE म्हणजेच Near-Earth Object Wide-field Infrared Survey Explorer. लघुग्रह, उल्कापिंड इत्यादी शोधण्यासाठी जगभरात दुर्बिणी बसवण्यात आल्या आहेत. तसेच अनेक दुर्बिणी अवकाशातूनही असेच काम करतात.
advertisement
गेल्या 14 वर्षांपासून निओवाईज मिशन आपल्या पृथ्वीचं बाह्य धोक्यांपासून संरक्षण करण्यात गुंतलं. सुरुवातीला ही मोहीम कमी कालावधीसाठी तयार करण्यात आली होती, परंतु अंतराळात गेल्यावर या मोहिमेने अतिशय अचूक परिणाम दिले आणि शास्त्रज्ञ त्याचा वापर करत राहिले.
NEOWISE ने काय काय केलं?
2009 मध्ये सुरू करण्यात आलेले हे मिशन. इतकी वर्षे NEOWISE दुर्बीण पृथ्वीच्या निम्न कक्षेत राहिली. या दुर्बिणीने आपल्या सौरमालेतील 44 हजारांहन अधिक वस्तू शोधल्या. दुर्बिणीने लघुग्रह इत्यादींसारख्या पृथ्वीजवळील 3000 हून अधिक वस्तूंचे सर्वेक्षण केले आणि त्यापैकी 215 शोधले.
advertisement
का बंद झालं मिशन?
2009 मध्ये सुरू करण्यात आलेले हे मिशन 31 जुलै रोजी पूर्ण झालं. NEOWISE हे सूर्याच्या गतिविधींमध्ये आता वाढ होत असताना फारसे उपयुक्त ठरत नाही. परिणामी, नासाला आता नवीन दुर्बिणीची गरज आहे.
advertisement
31 जुलै रोजी NEOWISE दुर्बिणीचे अंतराळ यान हायबरनेशन मोडमध्ये गेलं. त्यानंतर ते हळूहळू पृथ्वीच्या दिशेने येण्यास सुरुवात करेल आणि या वर्षाच्या अखेरीस किंवा 2025 च्या सुरूवातीस पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर ते जळून जाईल.
आता पृथ्वीचं रक्षण कोण करणार?
वृत्तानुसार, नासाने पृथ्वीजवळ लपलेल्या वस्तू ओळखण्यासाठी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. NEOWISE कडून मिळवलेल्या डेटाने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
advertisement
NEOWISE ला पर्याय म्हणून, NASA ने NEO Surveyor म्हणजेच Near Earth Object Surveyor Telescope लाँच करण्याची योजना आखली आहे, जी 2027 पर्यंत अंतराळात पाठवली जाणार आहे. ही दुर्बीण पृथ्वीजवळ येणाऱ्या आणि  आपल्या ग्रहासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या वस्तूंचा शोध घेईल.
मराठी बातम्या/Viral/
Shocking! पृथ्वीला वाचवणारं नासाचं मिशन बंद; आता काय होणार? पृथ्वी संकटात?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement