VIDEO : मंडपात नवऱ्याने 2 बायकांशी केलं लग्न, म्हणाला, "दोघींवर समान प्रेम करेन", 1000 लोकांसमोर घेतली शपथ!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
तेलंगणातील कुमारंभिम आसिफाबाद जिल्ह्यातील गुमनूर गावातील सुर्यदेव या युवकाने एकाच वेळी दोन महिलांशी विवाह केला. सुर्यदेव आधी कनक लालसोबत प्रेमसंबंधात होता, मात्र काही कारणांमुळे ते दुरावले. त्यानंतर...
तेलंगणातील कुमुरंबीम आसिफाबाद येथे एक असा प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. एकाच मांडवात दोन नववधू एका नवऱ्यासोबत उपस्थित होत्या. अग्निसाक्षी मानून या तिघांनी मिळून सात फेरे घेतले. केवळ एकाच नव्हे, तर आसपासच्या अनेक गावांतील लोक या अनोख्या विवाहाचे साक्षीदार होण्यासाठी जमले होते. हजारो लोकांसमोर या तरुणाने अग्नीला साक्षी मानून शपथ घेतली की, तो दोन्ही पत्नींवर समान प्रेम करेल. सध्या या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अनोख लग्न आणि पाहुणे जमले 1000
तेलंगणातील कुमारंभीम आसिफाबाद जिल्ह्यातील लिंगापूर मंडळातील गुम्नूर गावातील एका तरुणाने आदिवासी प्रथा-परंपरेनुसार एकाच वेळी दोन महिलांशी विवाह केला. या अनोख्या विवाहाचे साक्षीदार गावात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण होते. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यदेव हैदराबाद येथील चित्रपट उद्योगात काम करतो. त्याचे सिरपूर (यू) मंडळातील शेट्टीहाडपनूर राजुलागुडा येथील कनक लालसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांचे संबंध बिघडले आणि त्याने तिच्यापासून दुरावा ठेवला.
advertisement
पंचायतीने जुळवले लग्न
दरम्यान, सूर्यदेवचे त्याच मंडळातील पुल्लारा गावातील आत्रम जलकार देवीसोबतही प्रेमसंबंध जुळले होते. जेव्हा कनक लालला याची माहिती मिळाली, तेव्हा तिने लग्नाचा हट्ट धरला आणि गावकऱ्यांच्या मदतीने पंचायत बोलावली. सूर्यदेव जलकार देवीला हैदराबादला घेऊन गेला, पण त्याच्या कुटुंबीयांनी हस्तक्षेप करून दुसरी पंचायत बोलावली.
Jab Miya aur do biwi raazi tho kya karega kaazi? Suryadev from Gumnoor village Lingapur mandal, #KomuramBheemAsifabad district married Lal Devi & Jhalkari Devi in a tribal #weddingceremony on Thursday; trio's decision shocked community but they eventually accepted #WeddingOf3 pic.twitter.com/qgbpEndFcb
— Uma Sudhir (@umasudhir) March 28, 2025
advertisement
दोघींनाही समान प्रेम देण्याचे बॉण्डवर लेखी आश्वासन
गावचे पटेल आणि माजी सरपंच आत्रम यांच्यासह गावकऱ्यांच्या उपस्थितीत सूर्यदेव दोन्ही महिलांशी लग्न करण्यास तयार झाला. तरुणाने पंचायतीसमोर एक बॉण्ड साइन केला, ज्यामध्ये त्याने दोन्ही नववधूंना समान काळजी आणि जबाबदारी देण्याचे वचन दिले. त्यानंतर 27 मार्च रोजी आदिवासी प्रथा-परंपरेनुसार एकाच ठिकाणी या तिघांचे एकत्रित लग्न झाले. यासाठी पत्रिका वाटण्यात आल्या होत्या आणि गावात फ्लेक्स बोर्डही लावण्यात आले होते. या अनोख्या विवाह सोहळ्याला तीन गावांतील सुमारे 1000 लोकांनी हजेरी लावली होती.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 29, 2025 4:09 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : मंडपात नवऱ्याने 2 बायकांशी केलं लग्न, म्हणाला, "दोघींवर समान प्रेम करेन", 1000 लोकांसमोर घेतली शपथ!