advertisement

Stunt Video: पापा की परी रस्त्यावर 'उडी', स्कूटीवर स्टंटबाजीने नेलं मृत्यूच्या दारात!

Last Updated:

आजकाल तरुणाईमध्ये स्टंटबाजी करण्याची खूप क्रेझ पहायला मिळते. मुलं-मुली रस्त्यावर स्टंटबाजी करत स्वतःचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढलं आहे.

पापा की परी रस्त्यावर 'उडी'
पापा की परी रस्त्यावर 'उडी'
नवी दिल्ली : आजकाल तरुणाईमध्ये स्टंटबाजी करण्याची खूप क्रेझ पहायला मिळते. मुलं-मुली रस्त्यावर स्टंटबाजी करत स्वतःचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढलं आहे. स्टंटबाजीच्या नादात गाड्यांचा तोल निसटून भीषण अपघात घडतात. अशा अपघातात लोकांचा जीवही जातो. मात्र तरीही या घटना कमी होताना दिसत नाहीये. असाच एक अपघात घडला असून तरुणी स्टंटबाजीच्या नादात जोरात आपटतात.
रस्त्यावर दोन तरुणी स्कूटीवर चालल्या असतात. मात्र त्या स्टंटबाजी करण्याच्या नादात पडतात. स्कूटी घेऊन जोरात पडतात. पाहूनच त्यांना जोरात लागलं असल्याचं समजून येतंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अशा रस्त्यावर स्टंटबाजीला विरोध कराल.
स्टंटबाजीचा समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर गाड्या जात आहेत. यामध्ये स्कूटीवर दोन तरुणी आहेत. त्यातील एक तरुणी मागच्या सीटवर उभी राहिलीय. आणि एक गाडी चालवत आहेत. तेवढ्यात एक बाईक राईडर बाजूने जात असतो त्याला हाय करण्यासाठी दोघीही हात वर करतात मात्र तेवढ्यात गाडी चालवणाऱ्या मुलीचं गाडीवरचं नियंत्रण सुटतं आणि दोघीही काही अंतरावर जाऊन पडतात. याशिवाय त्यांनी हेल्मेटही घातलेलं नाही. हेल्मेट असतं तर कदाचित त्यांना कमी मार लागला असता.
advertisement
पापा की परींचा हा व्हिडीओ @uttarakhandcops नावाच्या X अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 19 सेकंदांचा हा व्हिडीओ शेअर करत पोलिसानी लिहिलं की, 'अशी स्टंटबाजी करुन जीव धोक्यात टाकू नका, दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट घाला.'
view comments
मराठी बातम्या/Viral/
Stunt Video: पापा की परी रस्त्यावर 'उडी', स्कूटीवर स्टंटबाजीने नेलं मृत्यूच्या दारात!
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement