Viral News : 6 महिने तंबू ठोकून मॉलमध्ये राहिली व्यक्ती; कोणाला सुगावा नाही, असं उलगडलं गुपित

Last Updated:

तुम्ही कधी कोणाला मॉलमध्ये राहताना पाहिलंय का? सध्या अशी एक घटना समोर आलीय, ज्यामध्ये एक व्यक्ती मॉलमध्ये चक्क सहा महिने राहिला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

 6 महिने तंबू ठोकून मॉलमध्ये राहिली व्यक्ती
6 महिने तंबू ठोकून मॉलमध्ये राहिली व्यक्ती
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : तुम्ही मॉलमध्ये शॉपिंगसाठी जातच असाल. मात्र शॉपिंग मॉलही काही कालावधीसाठी उघडं असतं. त्यांचाही टाईम असतो ज्यावेळी ते मॉल बंद करत असतात. त्यामुळे मॉल सुरु असलेल्या वेळेतच आपण जाऊन फिरु शकतो. मात्र तुम्ही कधी कोणाला मॉलमध्ये राहताना पाहिलंय का? सध्या अशी एक घटना समोर आलीय, ज्यामध्ये एक व्यक्ती मॉलमध्ये चक्क सहा महिने राहिला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
एका चिनी व्यक्तीने मॉलचे घरामध्ये रूपांतर केलं. सहा महिने तो मॉलमध्येच राहिला. पण नंतर त्याला अटक करून त्याला मॉलमधून हाकलण्यात आलं. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हा चिनी व्यक्ती गेल्या 6 महिन्यांपासून येथे राहत होता, मात्र त्याची कोणालाच माहिती नव्हती.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, या चिनी व्यक्तीने अतिशय हुशारीने पायऱ्यांखाली तंबू ठोकला. मंडपासोबतच टेबल, खुर्ची आणि कॉम्प्युटरही त्यांनी बसवले होते. हा माणूस गेल्या 6 महिन्यांपासून शॉपिंग सेंटरच्या आउटलेटचा वापर करत होता आणि त्याची इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करत होता. काही महिन्यांपूर्वी, मॉल सिक्युरिटीने तंबूत राहणार्‍या व्यक्तीला पकडले, परंतु नंतर त्याला तेथे राहण्याची परवानगी देण्यात आली. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना येथे राहण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितलं की, तो अभ्यासासाठी शांत जागा शोधत आहे, म्हणून येथे राहण्यासाठी आलो आहे. असं सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला येथे राहण्याची परवानगी मिळाली.
advertisement
त्या व्यक्तीला वाटलं की त्याची चिंता आणि त्रास कमी झाला आहे. मात्र, एके दिवशी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी मॉलच्या सुरक्षा रक्षकाने त्याला पाहिलं आणि चिनी माणसाला अटक करण्यात आली.
मराठी बातम्या/Viral/
Viral News : 6 महिने तंबू ठोकून मॉलमध्ये राहिली व्यक्ती; कोणाला सुगावा नाही, असं उलगडलं गुपित
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement