Viral Video : व्यक्ती विमानात व्हिडीओ बनवत होती, अचानक मोबाईल खाली पडला आणि पाहा काय रेकॉर्ड झालं?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एका व्यक्तीकडून विमानातून मोबाईल खाली पडला. त्यानंतर कॅमेऱ्यात जे अद्भूत दृश्य रेकॉर्ड झालं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
नवी दिल्ली, 26 डिसेंबर : आजकाल लोकांच्या हातात सतत मोबाईल असतो. कधी कुठेही बाहेर गेले तरी लोक आवर्जुन मोबाईल काढून त्यामध्ये फोटो, व्हिडीओ काढतात. 24 तासांपैकी बराच वेळ लोक मोबाईलमध्येत घालवतात. मात्र फोनमुळे बऱ्याचदा लोकांसोबत अपघातही घडतात. बऱ्याच विचित्र घटना समोर येत असतात. अशातच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एका व्यक्तीकडून विमानातून मोबाईल खाली पडला. त्यानंतर कॅमेऱ्यात जे अद्भूत दृश्य रेकॉर्ड झालं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
विमानातून व्हिडीओ काढताना व्यक्तीकडून अचानक मोबाईल खाली पडला. त्यानंतर मोबाईलमद्ये जे दृश्य रेकॉर्ड झालं ते चकित करणारं होतं. रेकॉर्ड झालेला व्हिडीओ सध्या समोर आलाय. हा व्हिडीओ प्रचंड वेगानं इंटरनेटवर व्हायरल होतोय.
विमानातून पडलेल्या मोबाईलमध्ये जे दृश्य रेकॉर्ड झालं याचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोबाईल खूप वेगानं खाली पडत होता. त्यामुळे कोणतंही दृश्य स्थिर दिसलं नाही. याशिवाय वाऱ्याचा आवाजही खूप मोठ्यानं येतोय. शेवटी मोबाईल जमिनीवर येऊन आदळल्यावर एक डुक्कर मोबाईलजवळ आला. तो कॅमेऱ्याला खाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
advertisement
advertisement
Nextdoor नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच चकित झालेत. अनेकांनी कमेंट करत प्रश्नही विचारले. एवढ्या उंचावरुन मोबाईल खाली पडल्यावर मोबाईलचं काय झालं?
दरम्यान, सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. दररोज काहीतरी वेगळं पहायला मिळतं. अनेक निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 26, 2023 9:07 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : व्यक्ती विमानात व्हिडीओ बनवत होती, अचानक मोबाईल खाली पडला आणि पाहा काय रेकॉर्ड झालं?









