OMG! भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे 60 कोटींची नंबर प्लेट; जगात सर्वात महाग, काय आहे यात खास पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
महागडी गाडी असणं हे श्रीमंतीचं लक्षण आहे पण महागडी नंबर प्लेट असणं ही वेगळी गोष्ट आहे.
दुबई, 16 नोव्हेंबर : आपली एखादी कार असावी असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. काही लोक तर कारचे इतके शौकीन असतात की त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कार असतात. बरेच लोक तर नंबर प्लेट्सचेही शौकीन असतात. एका खास नंबर प्लेटसाठी वाट्टेल तितका पैसा मोजण्याचीही त्यांची तयारी असते. अशीच एक व्यक्ती जी भारतीय वंशाची आहे, तिनं तब्बल 60 कोटी रुपयांची कार नंबर प्लेट खरेदी केली.
बलविंदर साहनी असं या व्यक्तीचं नाव. भारतीय वंशाचा बिझनेसमन दुबईत राहतो. तो आरएसजी ग्रुपचा मालक आहे. त्याच्याकडे अनेक गाड्या आहेत. जवळपास 100 कार आहेत. यात अनेक रोल्स रॉसेसचा समावेश आहे. महागडी गाडी असणं हे श्रीमंतीचं लक्षण आहे पण महागडी नंबर प्लेट असणं ही वेगळी गोष्ट आहे. या दोन्हीत बलविंदर साहनी आघाडीवर असल्याचं दिसतं.
advertisement
त्याच्याकडे आधीच एक महागडी नंबर प्लेट आहे. या प्लेटचा क्रमांक 05 आहे. सिंग यांनी या प्लेटसाठी 2.5 दिरहम खर्च केले. भारतीय चलनात त्याची किंमत 45.3 कोटी रुपये असेल. आता त्याच्याकडे 3.3 दशलक्ष दिरहम किमतीची नंबर प्लेट आहे. भारतीय चलनात पाहिल्यास ते सुमारे 60 कोटी रुपये आहे. या नंबर प्लेटची संख्या D5 आहे.
advertisement
साहनीने बोली लावून D5 नंबर प्लेट जिंकली. हा लिलाव दुबईच्या रोड अँड ट्रान्सपोर्टने आयोजित केला होता. 80 प्लेटसाठी 300 जणांनी बोली लावली होती. या बोलीमध्ये सिंगने 60 कोटी रुपयांची नंबर प्लेट जिंकली. लिलावाच्या इतिहासातील ही सर्वात महागडी बोली आहे आणि ती जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट देखील बनली आहे.

advertisement
बलविंदर पाचला त्याचा लकी नंबर मानतो. पण युनिक नंबर प्लेट्सची साहनीची आवड अजून संपलेली नाही. 60 कोटी रुपयांची प्लेट खरेदी केल्यानंतर त्याला आपले प्लेट कनेक्शन आणखी वाढवायचं आहे. त्याला अजून महागड्या प्लेट्स घ्यायच्या आहेत.
Location :
Delhi
First Published :
November 16, 2023 6:29 PM IST
मराठी बातम्या/Viral/
OMG! भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे 60 कोटींची नंबर प्लेट; जगात सर्वात महाग, काय आहे यात खास पाहा