अरे बाप रे! 8 वर्षांच्या मुलाच्या पापणीतून काढले 30 जिवंत किडे, अखेर दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
सावरकुंडला येथे एक धक्कादायक आणि अत्यंत दुर्मिळ घटना समोर आली आहे. एका 8 वर्षांच्या मुलाच्या पापणीतून तब्बल 30 जिवंत किडे आणि...
एका 8 वर्षांच्या मुलाच्या पापणीतून तब्बल 30 जीवंत किडे आणि 35 हून अधिक अंडी बाहेर काढण्यात आली आहेत. सावरकुंडला येथील लल्लुभई सेठ आरोग्य मंदिर हॉस्पिटलमध्ये दीड तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर हे किडे आणि अंडी यशस्वीरित्या काढण्यात आली. गुजरात अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला इथं ही अत्यंत दुर्मिळ आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.
डोळ्यात 30 जीवंत कीडे अन् 35 अंडी
सावरकुंडला येथील 100% मोफत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकतंच नेत्ररोग विभाग सुरू झाला आहे. डोळ्यात दुखत असल्याची तक्रार घेऊन आलेल्या या 8 वर्षांच्या मुलाची याच विभागात तपासणी करण्यात आली. डॉ. मृगांक पटेल यांनी तपासणी केली असता, मुलाच्या पापणीत परजीवी (parasites) म्हणजेच सामान्य भाषेत ज्यांना 'डोक्यातील उवा' म्हणतात, ते असल्याचं निदान झालं. विशेष म्हणजे, इंजेक्शन न देता फक्त ड्रॉप्सच्या मदतीने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली, असं डॉक्टरांनी सांगितलं. या शस्त्रक्रियेत सुमारे 30 परजीवी आणि 35 अंडी बाहेर काढण्यात आली.
advertisement
खतरनाक असतात हे कीडे
अमरेली जिल्ह्यात अशा प्रकारची दुर्मिळ घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. लहान मुलांमध्ये अशी प्रकरणं सामान्यपणे दिसत नाहीत. शस्त्रक्रियेनंतर मुलाला लगेच बरं वाटलं आणि पुढच्या तपासणीत तो हसताना-खेळताना दिसला. वैद्यकीय किडे डोळ्यांसाठी हानिकारक असतात, ते रक्त शोषतात आणि डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकतात.
हे ही वाचा : 10 दिवस, 10 ग्रॅम न चुकता घ्या 'हे' चूर्ण; लिव्हर अन् आतडी10 मिनिटांत होतील स्वच्छ, शिल्लक राहणार नाही घाण!
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 09, 2025 5:33 PM IST
मराठी बातम्या/Viral/
अरे बाप रे! 8 वर्षांच्या मुलाच्या पापणीतून काढले 30 जिवंत किडे, अखेर दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी