बाहेरुन पाहताना ती फक्त कचऱ्याची पिशवी, पण उघडून पाहिलं तेव्हा सगळेच हादरले; भिकारी महिलेकडे असं काय सापडलं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ती महिला तिच्या आजूबाजूला काही जुने कट्टे आणि कचऱ्याच्या पिशव्या ठेवत असे. मात्र, त्या पिशव्यांबद्दल तिचं अतोनात जिव्हाळ्याचं वागणं लोकांच्या नजरेत आलं. ती त्यांना कोणालाही स्पर्श करू देत नव्हती.
मुंबई : आपण अनेकदा शहराच्या रस्त्यांवर, चौकात किंवा मंदिरांच्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना पाहतो. त्यांच्याकडे लोक दया दाखवतात, काहीजण थोडे पैसे देतात आणि पुढे निघून जातात. परंतु, कधी विचार केलाय का या छोट्या झोपड्यांमध्ये किंवा कचर्याच्या ढिगाऱ्यात किती रहस्यं दडलेली असतात? कर्नाटकातील मंगलुरूमध्ये नुकतीच अशीच एक घटना समोर आली, जी ऐकून सगळेच थक्क झाले.
मंगलुरूच्या पठानपुरा परिसरात गेली तब्बल 13 वर्षं एका घराबाहेर राहत असलेली एक दिव्यांग महिला भिकारी अचानक चर्चेत आली. ती नेहमीप्रमाणे एका कोपऱ्यात बसलेली असायची. लोक तिच्याकडे रोज जात, तिला थोडं अन्न, काही नाणी देत आणि पुढे जात. पण काही दिवसांपूर्वी, परिसरातील लोकांनी तिला तिथून हटवण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच या सगळ्या गोष्टीचा गूढ उलगडलं.
advertisement
ती महिला तिच्या आजूबाजूला काही जुने कट्टे आणि कचऱ्याच्या पिशव्या ठेवत असे. मात्र, त्या पिशव्यांबद्दल तिचं अतोनात जिव्हाळ्याचं वागणं लोकांच्या नजरेत आलं. ती त्यांना कोणालाही स्पर्श करू देत नव्हती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती त्या पिशव्यांच्या जवळ बसून राहायची, जणू काही तिचं सगळं आयुष्य तिथेच आहे.
लोकांना संशय आला आणि त्यांनी शेवटी तिच्या पिशव्यांची तपासणी करण्याचं ठरवलं. आणि मग जे समोर आलं, ते पाहून सगळेच थक्क झाले. त्या पिशव्यांमधून लाखो रुपयांचे जुने आणि नवे नोटा आणि नाणी सापडले. लोकांनी पैशांमधील पैशांची मोजणी सुरू केली, पण पैसे संपण्याचं नावच घेत नव्हते.
advertisement

सोर्स : सोशल मीडिया
स्थानिक लोकांनी लगेच पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आणि ती महिला सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली. तपासात हेही समोर आलं की ती महिला मानसिकदृष्ट्या कमजोर असून, लोकांनी दिलेले पैसे ती अनेक वर्षांपासून जपून ठेवत होती. कुणालाही याची कल्पना नव्हती की एका भिकारीकडे एवढी मोठी रक्कम साठवलेली असेल.
advertisement
पोलिसांनी सांगितलं की सापडलेली रक्कम सरकारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समाजातील गरजू लोकांच्या मदतीसाठी वापरली जाईल. तर त्या महिलेला सुरक्षित ठिकाणी ठेवून वैद्यकीय उपचारही दिले जाणार आहेत.
या घटनेने स्थानिक लोकांमध्ये आश्चर्य आणि सहानुभूती दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत. एक भिकारी महिला, जी वर्षानुवर्षं जगापासून वेगळी राहिली, तिच्या आयुष्यात इतकं "संपत्तीचं गुपित" दडलेलं असेल, हे कुणालाच स्वप्नातही वाटलं नव्हतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 5:45 PM IST
मराठी बातम्या/Viral/
बाहेरुन पाहताना ती फक्त कचऱ्याची पिशवी, पण उघडून पाहिलं तेव्हा सगळेच हादरले; भिकारी महिलेकडे असं काय सापडलं?


