Truck Accident : नशेत हातात घेतलं स्टेअरिंग, ट्रकवरचा ताबा सुटला आणि... डॉश कॅमेरात कैद झाला मृत्यूचा थरार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
वेगाच्या हव्यासात आणि नशेच्या नशेत चालवलेल्या ट्रकने काही सेकंदांत अनेक गाड्या चिरडल्या आणि तीन लोकांचा जीव गेला. हा संपूर्ण प्रसंग डॅशकॅममध्ये कैद झाला आहे.
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर रोज कुठेतरी अपघाताचे भयंकर व्हिडिओ समोर येतात. काही क्षणांत जीव कसे जातात, हे दृश्य पाहून मन सुन्न होतं. असाच एक अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये घडलेला भीषण ट्रक अपघाताचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. वेगाच्या हव्यासात आणि नशेच्या नशेत चालवलेल्या ट्रकने काही सेकंदांत अनेक गाड्या चिरडल्या आणि तीन लोकांचा जीव गेला. हा संपूर्ण प्रसंग डॅशकॅममध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात कॅलिफोर्नियातील ओंटारियो परिसरातील 10 फ्रीवे वर घडला. 21 वर्षांच्या एका युवकाने चालवलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या सुमारे 8 वाहनांना चिरडलं. या भीषण अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी होऊन रुग्णालयात दाखल आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा चालक युबा सिटीचा रहिवासी आहे आणि तो गाडी चालवताना नशेत होता, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सध्या त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
advertisement
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (माजी Twitter) वर @CollinRugg या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. केवळ 6 तासांत या पोस्टला 9 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये या अपघाताची संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये ट्रकसमोर जे काही आलं ते थेट रस्त्यावर चिरडल्याचं स्पष्ट दिसतं.
advertisement
NEW: 21-year-old semi-truck driver arrested on suspicion of DUI in a horrific crash on the 10 Freeway in Ontario, California.
California Highway Patrol investigators say the man, from Yuba City, was believed to have been on drugs.
Eight vehicles were involved in the crash, and… pic.twitter.com/h2e84BM1ov
— Collin Rugg (@CollinRugg) October 22, 2025
advertisement
या भयानक व्हिडिओनंतर यूजर्स कमेंट सेक्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त करत आहेत. एक यूजरनं लिहिलं, 'अत्यंत भीषण घटना, जखमी आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना.' तर दुसरा यूजर लिहितो, "मी माझ्या कुटुंबातील पाच सदस्यांना अशाच एका निष्काळजी ट्रक चालकामुळे गमावलं."
अशा घटना पुन्हा एकदा दाखवून देतात की वेग आणि निष्काळजीपणा किती प्राणघातक ठरू शकतो. एका क्षणाची चूक कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 23, 2025 9:22 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Truck Accident : नशेत हातात घेतलं स्टेअरिंग, ट्रकवरचा ताबा सुटला आणि... डॉश कॅमेरात कैद झाला मृत्यूचा थरार


