advertisement

अजबच! महिलांच्या भीतीने व्यक्तीनं स्वतःला 55 वर्ष घरात कोंडलं, काय आहे कारण?

Last Updated:

प्रत्येक माणसाला कोणत्या न कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. काहींना उंच ठिकाणी भीती वाटते तर कोणाला प्राण्यांची भीती वाटते. काहींना किटकांची भीती वाटते तर कोण अंधाराला घाबरतं.

महिलांच्या भीतीने व्यक्तीनं स्वतःला 55 वर्ष घरात कोंडलं
महिलांच्या भीतीने व्यक्तीनं स्वतःला 55 वर्ष घरात कोंडलं
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : प्रत्येक माणसाला कोणत्या न कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. काहींना उंच ठिकाणी भीती वाटते तर कोणाला प्राण्यांची भीती वाटते. काहींना किटकांची भीती वाटते तर कोण अंधाराला घाबरतं. असं प्रत्येकजणच कोणत्या तरी गोष्टीला घाबरत असतं. मात्र एक व्यक्ती असा आहे ज्याला महिलांची भीती वाटते. त्यानं महिलांच्या भीतीनं स्वतःला गेले 55 वर्ष डांबून ठेवलं आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? व्यक्तीनं असं करण्यामागे काय कारण आहे? याविषयी जाणून घेऊया.
जगात असाही एक व्यक्ती आहे ज्याला महिलांची भीती वाटते. ते पण एवढी भीती की त्यानं स्वतःला कित्येक वर्ष घरात बंद केलं. हे समोर आलेलं प्रकरण दक्षिण आफ्रिकेतील रवांडा येथील आहे. व्यक्तीच्या या अनोख्या भीतीचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.
महिलांची भीती वाटणाऱ्या या व्यक्तीचं नाव कॅलिटस्क न्झामविटा असून ते 71 वर्षांचे आहे. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षापासून स्वतःला घरात बंद केलंय तेही महिलांच्या भीतीमुळे. त्यांच्या घरापासून महिला दूर राहतील याचीही त्यांनी सोय केली आहे. यासाठी त्यांनी घराच्या बाहेर कुंपण लावलंय.
advertisement
आफ्रिकेच्या मीडियानुसार, कॅलिटस्कच्या शेजारी राहणाऱ्या एका अज्ञात महिलेनं सांगितलं की, त्याला कधीच घराबाहेर पडताना पाहिलं नाही. तो लहान असल्यापासून घराबाहेर पडला नाही. विचित्र गोष्ट म्हणजे त्याला महिलांची भीती वाटत असली तरी त्याला खायला देणारे आम्हीच आहोत. त्याला आमच्या जवळ यायला आवडत नाही त्यामुळे आम्ही त्याचं खायला घराबाहेर ठेवतो मग तो घेऊन जातो. खरंतर त्याला gynophobia नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या स्थितीत लोकांना महिलांची भीती वाटते.
advertisement
दरम्यान, गायनोफोबियाच्या लक्षणांमध्ये स्त्रियांबद्दल भीती वाटते. हा फोबिया दिवसेंदिवस वाढत जातो. अशा लोकांमध्ये पॅनिक अटॅक, जास्त घाम येणे, छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं दिसतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
अजबच! महिलांच्या भीतीने व्यक्तीनं स्वतःला 55 वर्ष घरात कोंडलं, काय आहे कारण?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement