सूर्य गायब होणार, भरदिवसा संपूर्ण जग अंधारात बुडणार, 2 ऑगस्टला असं काय घडणार?

Last Updated:

Solar Eclipse : संपूर्ण जग अचानक अंधारात बुडालं तर... तुम्हाला कसं वाटेल.... कल्पना करूनच अस्वस्थ वाटतं आहे ना. पण हे काल्पनिक नाही. असं प्रत्यक्षात घडणार आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : जर दिवसा रात्र झाली तर... संपूर्ण जग अचानक अंधारात बुडालं तर... तुम्हाला कसं वाटेल.... कल्पना करूनच अस्वस्थ वाटतं आहे ना. पण हे काल्पनिक नाही. असं प्रत्यक्षात घडणार आहे. ती वेळ जवळ आली आहे. 2 ऑगस्ट... या तारखेला असं काही घडणार आहे की सूर्य गायब होणार आहे आणि भरदिवसा संपूर्ण जग अंधारात बुडणार आहे.
2 ऑगस्टला पूर्ण सूर्यग्रहण होईल. तेही पूर्ण 6 मिनिटं.  पूर्ण सूर्यग्रहणामुळे संपूर्ण आकाश दिवसा अंधारात बुडेल. असं मानलं जातं की हे सूर्यग्रहण अटलांटिक महासागरापासून सुरू होईल. नंतर ते जिब्राल्टरच्या सामुद्रधुनी, दक्षिण स्पेन, उत्तर मोरोक्को, उत्तर अल्जेरिया, उत्तर ट्युनिशिया, ईशान्य लिबिया, इजिप्त, सुदान, नैऋत्य सौदी अरेबिया, येमेन, सोमालिया आणि अरबी द्वीपकल्पातील इतर देशांमध्ये जाईल. हिंदी महासागरावर ते मंद असेल.
advertisement
बहुतेक सूर्यग्रहणं 3 मिनिटांपेक्षा कमी काळ टिकतात,  इतिहासातील सर्वात मोठं पूर्ण सूर्यग्रहण 7 मिनिटे आणि 28 सेकंदांचं होतं जे 743 ईसापूर्वमध्ये घडलं. या सूर्यग्रहणाला 'ग्रेट नॉर्थ आफ्रिकन एक्लिप्सन' असंही म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे ते आफ्रिकेतील बहुतेक देशांमधून दिसलं.  2 ऑगस्ट 2027 रोजी होणाऱ्या पूर्ण सूर्यग्रहणामुळे जगातील अनेक भाग पूर्ण 6 मिनिटं अंधारात बुडालेले राहतील. जगातील विविध खंडांवर राहणारे कोट्यावधी लोक हे दृश्य पाहू शकतील. पुढील 100 वर्षे  2114 पर्यंत असं सूर्यग्रहण पुन्हा दिसणार नाही.
advertisement
अशा सूर्यग्रहणाचं कारण म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील दुर्मिळ खगोलीय संरेखन. इतक्या लांब सूर्यग्रहणाची तीन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर अंतरावर असेल. याला अपेलियन म्हणतात. यामुळे, सूर्य पृथ्वीपासून लहान दिसेल. त्याच वेळी, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल, ज्यामुळे तो मोठा दिसेल. तिसरं म्हणजे, चंद्राची सावली विषुववृत्तावर पडेल आणि सावली मंद गतीने वाढेल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
सूर्य गायब होणार, भरदिवसा संपूर्ण जग अंधारात बुडणार, 2 ऑगस्टला असं काय घडणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement