advertisement

Viral Video : मोमोज टाकून व्यक्तीनं बनवला चहा, किळसवाणा व्हिडीओ पाहून येईल संताप

Last Updated:

चहा अनेक लोकांना आवडतो. तुम्हाला संपूर्ण जगभरात अनेक असे अनेक चहाप्रेमी सापडतील. केव्हा कधीही लोक चहा घेऊ शकतात. आजकाल तर बदलत्या ट्रेंडनुसार चहातही नवनवीन अपडेट होत असलेली पहायला मिळत आहे.

मोमोज टाकून व्यक्तीनं बनवला चहा
मोमोज टाकून व्यक्तीनं बनवला चहा
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : चहा अनेक लोकांना आवडतो. तुम्हाला संपूर्ण जगभरात अनेक असे अनेक चहाप्रेमी सापडतील. केव्हा कधीही लोक चहा घेऊ शकतात. आजकाल तर बदलत्या ट्रेंडनुसार चहातही नवनवीन अपडेट होत असलेली पहायला मिळत आहे. लोक चहात अनेक वेगवेगळे पदार्थ टाकून चहा बनवत आहे. त्यामुळे बऱ्याचदा चहाप्रेमींचा संताप होतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये व्यक्तीनं मोमोज टाकून चहा बनवला. पाहून कोणालाही किळस येईल. मोमोज चहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चहा आणि मोमोज हे लोकांचे आवडते मानले जातात. दोघांची चवही वेगवेगळ्या प्रकारे वाढवली जाते. पण चहामध्ये मोमोज मिसळले तर? नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोमोज चहा बनवताना दिसत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीने चहा बनवण्यासाठी मोमोजचा वापर केला आहे. याशिवाय अंडयातील बलक देखील मिसळले आहे. व्यक्तीचे असं वागणं पाहून लोक संतप्त झाले आहेत. हा व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांनी या विचित्र मिश्रणाविषयी संताप व्यक्त केलाय.
advertisement
advertisement
foodiekashif नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ माजवताना पहायला मिळाला. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत.
दरम्यान, खाण्यामध्ये विचित्र मिश्रण करुन विक्रेते ग्राहकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. मात्र कधी कधी खूपच किळसवाणे पदार्थ मिश्रण करुन दिले जातात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : मोमोज टाकून व्यक्तीनं बनवला चहा, किळसवाणा व्हिडीओ पाहून येईल संताप
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement