सिग्नल फेल… आणि 15 मिनिटांत ट्रेनमधून उडवले 3000000000 रुपये, 16 चोरांनी घातला सर्वात मोठा ट्रेन डाका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चित्रपटांमध्ये आपण अनेकदा चोरीचे थरारक सीन पाहतो, पण इतिहासात घडलेली ही घटना होती जगातील सर्वात मोठी रेल्वे डकैती, ज्याला "द ग्रेट ट्रेन रॉबरी" (The Great Train Robbery) म्हणून ओळखलं जातं.
मुंबई : रेल्वे प्रवास हा अनेकांना रोमांचक आणि सुरक्षित वाटतो. पण इतिहासात एक अशी घटना घडली होती की ज्याने संपूर्ण जग हादरून गेले. चित्रपटांमध्ये आपण अनेकदा चोरीचे थरारक सीन पाहतो, पण इतिहासात घडलेली ही घटना होती जगातील सर्वात मोठी रेल्वे डकैती, ज्याला "द ग्रेट ट्रेन रॉबरी" (The Great Train Robbery) म्हणून ओळखलं जातं.
8 ऑगस्ट 1963 रोजी ब्रिटनमध्ये हा डाका घालण्यात आला. खास गोष्ट म्हणजे 16 चोरट्यांनी तब्बल 300 कोटी रुपयांची चोरी केली आणि त्यात कुठल्याही शस्त्राचा वापर केला नाही. फक्त एका लोखंडी रॉडच्या जोरावर त्यांनी ही लूट पूर्ण केली. चलती ट्रेन थांबवून त्यांनी नोटांनी भरलेले तब्बल 128 बॉक्स चोरले.
ट्रेनला टार्गेट कसं केलं?
7 ऑगस्ट1963 च्या रात्री ग्लासगो ते लंडन जाणारी रॉयल मेल (Royal Mail) ट्रेन निघाली होती. या ट्रेनमध्ये 72 पोस्ट ऑफिस कर्मचारी डाक छाटणीचं काम करत होते. 12 बोग्यांच्या या ट्रेनमधील सर्वात महत्त्वाचा कोच म्हणजे हाय व्हॅल्यू पॅकेजेस (HVP), ज्यात कोट्यवधी रुपये ठेवले होते. हाच कोच चोरट्यांचा टार्गेट होता.
advertisement
सिग्नलवर थांबलेली ट्रेन
8 ऑगस्टच्या पहाटे 3वाजता, ट्रेन लंडनला पोहोचण्याआधी एका सिग्नलवर आली. चोरट्यांनी आधीच हिरव्या सिग्नलला पेपरने झाकलं आणि बॅटरीच्या मदतीने लाल सिग्नल चालू केला. ट्रेनचे चालक जॅक मिल्स (वय 58) यांनी लगेच ट्रेन थांबवली. याच क्षणी 16 लुटेरे आत शिरले. एका चोरट्याने लोखंडी रॉडने ड्रायव्हर जॅकच्या डोक्यावर वार केला आणि तो बेशुद्ध झाला.
advertisement
15 मिनिटांत 300 कोटींची लूट
यानंतर चोरट्यांनी ट्रेनच्या HVP कोचमधील 128 बॉक्स बाहेर काढले. बॉक्स ट्रकपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मानवी साखळी (ह्यूमन चेन) तयार केली. अवघ्या 15 मिनिटांत सर्व बॉक्स ट्रकमध्ये भरले गेले आणि ते फरार झाले.
या घटनेनंतर पोलिसांनी अनेक वर्षं तपास केला. शेवटी लुटेरे पकडले गेले, पण 300 कोटी रुपयांचा प्रचंड खजिना कधीच परत मिळाला नाही. हीच घटना आजही इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे डकैती म्हणून ओळखली जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 7:06 PM IST
मराठी बातम्या/Viral/
सिग्नल फेल… आणि 15 मिनिटांत ट्रेनमधून उडवले 3000000000 रुपये, 16 चोरांनी घातला सर्वात मोठा ट्रेन डाका